जळगाव (प्रतिनिधी) देशातील पुढील पिढी घडवण्यात अंगणवाडी ही संस्था मोलाचे योगदान देते. बालकांचा शारीरिक आणि मानसिक विकासाचा पाया मजबूत करण्याचं काम अंगणवाड्या करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यावर्षी १०८ अंगणवाडी इमारत बांधकामसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कॅबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी १० कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 108 अंगांवड्यांना स्वतःच्या इमारती होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी प्राधान्य क्रमानुसार अंगणवाडी बांधकाम प्रशासकीय मान्यता दिल्या आहे. जळगांव जिल्ह्यातील अंगणवाडी ही गावातील महिला आणि बाल विकासाचे केंद्र व्हावे या दृष्टीने कामकाज व्हावे व संबंधित संबंधित अभियंत्यांनी मुदतीत आणि दर्जेदार कामे करण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात अजूनही 376 अंगणवाड्याना स्वतःच्या इमारती नाही. त्यामुळे उर्वरित असलेल्या 376 अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी 3 वर्षात टप्या-टप्याने 100% निधी मंजूर करून अंगण वाड्यांसाठी 100% स्वतःच्या इमारती असलेला जळगाव जिल्हा असेल अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली असून मुदतीत व दर्जेदार पद्धतीने बांधकाम करण्याचे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात 3438 तर जिल्हा परिषद अंतर्गत शहरी भागात 203 असे एकूण 3641 अंगणवाडी केंद्र सुरू आहेत. मागील सन 2019- ते 2020-21 या दोन वर्षांच्या कार्यकाळात डीपीडिसी मधून एकूण तब्बल 282 अंगणवाड्या साठी 24 कोटी निधी मंजूर करण्यात आला असून अंगणवाडी बांधकामे प्रगतीत आहे तर काही कामे पूर्ण करण्यात आलेली आहे.
या वर्षी तालुका निहाय मंजूर अंगणवाड्या
ज्या अंगणवाडी केंद्र उघड्यावर, भाड्याच्या रूम मध्ये, एकत्र किंवा ग्रामपंचायत इमारतीत भरत होत्या जिल्ह्यातील अश्या 108 अंगणवाड्याना प्रशासकीय मान्यता देण्यात याव्या असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत यांना दिले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकतेच जिल्ह्यात 108 अंगणवाड्या इमारत बांधकामसाठी प्राधान्य क्रमानुसार अंगणवाडी बांधकाम प्रशासकीय मान्यता दिली असून त्यात अमळनेर – 4 , भडगाव – 4 , भुसावळ – 2, बोदवड – 3 , चाळीसगाव – 11 , चोपडा – 8 , धरणगाव – 6, एरंडोल – 5 , जळगाव – 8 , जामनेर – 12 , मुक्ताईनगर – 5 , पाचोरा – 8 , पारोळा – 6 , रावेर – 8 , यावल – 18 अश्या 108 अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती होणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका, मदतनीस व बालकांना शैक्षणिक दृष्ट्या मोठा दिलासा मिळणार आहे.
3 वर्षात 100% अंगणवाड्याना स्वतःच्या इमारती होणार !
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व, जिल्हाधिकारी अभिजित राउत व मुख्य कार्यकारी अधिकारी ,डॉ पंकज आशिया यांनी अंगणवाड्या , शाळा खोल्या व स्मशानभूमी बांधकामा संदर्भात गंभीर दाखल घेऊन डीपीडीसी मार्फत 2-3 वर्षात सदरची 100% बांधकामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जिल्ह्यातील 3641 अंगणवाडी इमारतीपैकी उर्वरित 376 अंगणवाड्याना 3वर्षात 100% इमारतीच्या बांधकामास मंजुरी देण्यासाठी डीपीडिसी मार्फत निधी उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. त्यामुळे 100% अंगणवाड्याना स्वतःच्या इमारती असलेला जळगाव जिल्हा होणार असल्याची ग्वाहीही दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत यांनी याबाबत सूक्ष्म नियोजन केलेले असून टप्या – टप्याने अंगणवाडी बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे.