जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ११४३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १०४४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज अठरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – २९६, जळगाव ग्रामीण-४४, भुसावळ- ९९, अमळनेर-३१, चोपडा-९०, पाचोरा-४३, भडगाव-०४, धरणगाव-५५, यावल-३३, एरंडोल-१२, जामनेर-६८, रावेर-८३, पारोळा-३८, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-१९७, बोदवड-५३, इतर जिल्ह्यातील-०७ असे एकुण ११४३ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १०४ हजार १५२ पर्यंत पोहचली असून ९० हजार ५०४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज अठरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १८२७ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ११८२१ रुग्ण सध्या उपचार घेताय.