चाळीसगाव (प्रतिनिधी) कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देत मागील दिड महिन्यापासून १४ वर्षीय मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील प्रवीण नवनाथ मोरे याने गावातीलच १४ वर्षीय मुलीच्या मनाविरुद्ध तिला मारहाण करून व तिच्या कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देत बळजबरीने शेतातील झोपडीत शारिरीक संबंध प्रस्थापित करत होता. त्रास असह्य झाल्यानंतर पिडीत मुलीने कुटुंबियांना सर्व आपबिती सांगितली. त्यानंतर पिडीतेच्या पालकांनी तत्काळ चाळीसगाव पोलिसात धाव घेत आपली तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ पोस्को अंतर्गत गुन्हा केला असून पुढील तपास पीएसआय प्रदीप शेवाळे हे करीत असून संशयित आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.