धरणगाव (प्रतिनिधी) १५०० महिलांच्या उपस्थितीत येथे शिवसेना महिला आघाडीच्यावतीने गांधी उद्यानच्या प्रांगणात पालकमंत्र्यांचा उपस्थितीत हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला.
सविस्तर वृत्त असे की, येथील शिवसेना महिला आघाडीने महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, प्र. नगराध्यक्षा कल्पना विलास महाजन, नगराध्यक्षा उषा वाघ, महिला जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, चोपडा येथील आमदार लता सोनवणे, महिला उपजिल्हाप्रमुख सुनीता किशोर पाटील, व्याख्याते हभप गजानन महाराज वरसाडेकर उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांचा हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. महिला म्हणजे सुप्त गुणांचा खजिना असतो आणि दिलेले वचन पाळणाऱ्या असतात. कितीही मोठी सत्ता असली तरी उलथवून टाकण्याची ताकद महिलांमध्ये असते, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महिलांना संबोधित करतांना सांगितले.
घराघरात शिवाजी महाराज जन्माला यायचे असतील तर महिलांनी आई जिजाऊ झाले पाहिजे असे प्रतिपादन हभप गजानन महाराज यांनी केले. याप्रसंगी महानंदा पाटील, सुनीता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. लता सोनवणे होते. अध्यक्षीय भाषणात आ. लता सोनवणे महिलांचे उत्कर्ष करण्यासाठीचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित १५०० महिलांना प्लास्टिकचा कंडा भेट देण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा पाटील यांनी उपस्थित महिलावतीने भावना व्यक्त करतांना सागितले की धरणगावात शिवसेना व महिला आघाडीतर्फे सामाजिक उपक्रम राबवत असतात अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक नगराध्यक्षा उषा वाघ यांनी केले. सूत्रसंचालन नगरसेविका कीर्ती मराठे यांनी केले व आभार नगरसेविका अंजली विसावे यांनी मानले.