धरणगाव (प्रतिनिधी) जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. त्यांना वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील व स्त्रीरोग तज्ञ डॉ. लीलाधर बोरसे यांचे सहकार्य लाभले.
शस्त्रक्रियेदरम्यान भदाणे, मोरावकर, सोनार, लांडगे यांनी सहकार्य केले. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉ. गिरीश चौधरी व सर्व स्टाफ व कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे ५ वर्षांनी आज ग्रामीण रुग्णालयाच्या O.T त संतती कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत.