जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १००६ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ११२५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज वीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – १७३, जळगाव ग्रामीण-४७, भुसावळ- १३०, अमळनेर-६०, चोपडा-९७, पाचोरा-४७, भडगाव-११, धरणगाव-३३, यावल-२५, एरंडोल-७३, जामनेर-३८, रावेर-७०, पारोळा-२०, चाळीसगाव-५०, मुक्ताईनगर-९०, बोदवड-३५, इतर जिल्ह्यातील-०७ असे एकुण १००६ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ११९ हजार ९३४ पर्यंत पोहचली असून १०७ हजार ०२६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज वीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २१४२ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १०७६६ रुग्ण सध्या उपचार घेताय.