जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १०४८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १०१५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एकवीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – १५९, जळगाव ग्रामीण-५३, भुसावळ- १५७, अमळनेर-७१, चोपडा-७२, पाचोरा-५७, भडगाव-१८, धरणगाव-४२, यावल-३३, एरंडोल-११३, जामनेर-३७, रावेर-७४, पारोळा-२८, चाळीसगाव-६६, मुक्ताईनगर-३७, बोदवड-१५, इतर जिल्ह्यातील-१६ असे एकुण १०४८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ११७ हजार ९१६ पर्यंत पोहचली असून १०४ हजार ९०६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकवीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २०९९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १०९११ रुग्ण सध्या उपचार घेताय.