TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड झाकीर रहमान लखवीला अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) नवीन वर्षाच्या सुरुवातील एक चांगली बातमी समोर आली आहे. मुंबईवर झालेल्या २६/११ या अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी झाकीउर रहमान लखवी याला आज पाकिस्तानातून अटक करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. दहशतवाद्यांना पैसे पुरविल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

दहशतवाद्यांची मदत करणे आणि त्यांना फंडिंग केल्याप्रकरणी लखवीवर ही कारवाई करण्यात आली आहे. झाकीर रहमान लखवीने हाफीज सईदसोबत मिळून २६/११ च्या हल्ल्याचा कट रचला होता. मुंबई हल्ल्याचा कट रचणे आणि त्याच्या अंमलबजावणीत हाफिज सईद याच्यासोबत झाकी उर रेहमान लखवी याचा हात होता. यापूर्वी आलेल्या माहितीनुसार मुंबईवर झालेल्या २६/११ या अतिरेकी हल्ल्याचा कट, आखणी आणि अंमलबजावणीत लखवी यांचा थेट सहभाग होता. २६/११ च्या हल्ल्यापूर्वी लखवीने डेव्हिड हेडलीला पुन्हा काम करण्यासाठी कसे राजी केले, मार्गदर्शन केले याविषयीही तपास सुरू झाला आहे. लष्कर-ए-तैयबा या अतिरेकी संघटनेचा कमांडर लखवीला संयुक्त राष्ट्र संघाने मुंबई हल्ल्यानंतर जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर केलं होतं. मुंबई हल्ल्याच्या चौकशीदरम्यान हाफिस सईदला दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण योजना तयार करण्याचे काम लखवीने दिले होते. या हल्ल्यात, पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेतील अतिरेक्यांनी मुंबई शहरात अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात १६६ लोक ठार झाले, तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते. अनेक निरपराध लोकांच्या मृत्यूचा कट आखणाऱ्या लखवीला सुमारे सहा वर्षांच्या कोठडीनंतर एप्रिल २०१५ मध्ये पाकिस्तानच्या तुरुंगातून सोडण्यात आले होते.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेशन कमांडर लखवीला मुंबई हल्ल्यानंतर २००८ मध्ये युएनएससीच्या प्रस्तावानुसार संयुक्त राष्ट्रांद्वारे जागतीक दहशतवादी म्हणून घोषीत करण्यात आले होते. मुंबई हल्ल्याच्या तपासादरम्यान हे स्पष्ट झालं होतं की, लखवीनेच हाफीज सईदला दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण योजना आखून दिली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

पोलीस कॉलनीतील नागरिकांसाठी महापौरांनी केली टँकरची व्यवस्था !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : एकनाथराव खडसेंना दाऊद गॅगच्या नावाने धमकी !

April 17, 2024

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण; शिव कॉलनी व अग्रवाल चौक भुयारी मार्ग बाबत दिशाभूल करीत आहे – फारूक शेख

December 12, 2020

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार १६ नोव्हेंबर २०२२ !

November 16, 2022

सर्पदंशानंतर जिवंत साप घेऊन ‘तो’ पोहचला थेट रुग्णालयात !

October 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group