जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ५ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. तर दुसरीकडे १ रुग्णाने कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर – ०१, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-०२, अमळनेर-००, चोपडा-०१, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-०१, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ५ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४२ हजार ८३८ पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार २३५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर २४ रुग्ण सध्या उपचार घेताय.