अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पळासदरे गावातील एकाची क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या नावाखाली ६७ हजारात फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संजय बाबुराव पाटील (वय ५१, धंदा – शेती रा.पळासदरे ता.अमळनेर) यांनी तक्रार दिली आहे.
या संदर्भात अधिक असे की, दि.३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास संजय पाटील यांना त्यांच्या मोबाईलवर मो.क्र.७६६७४६९४७० वरील धारक इसम (नाव गाव माहीत नाही) याने फोन करुन मी एसबीआयचा साहेब बोलत आहे, असे सांगितले. संजय पाटील समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर बोलण्यावर विश्वास ठेवत त्यांच्याकडील एसबीआय बँकेच्या दोन्ही क्रेडीट कार्ड बंद करणे असल्याने क्रेडीट कार्डवरील १६ अंक असलेले आकडे व क्रेडीट कार्ड मागील बाजूस असलेले ३ अंकाचा सीव्हीव्ही क्रंमाक सांगितला. त्यानंतर मोबाईल क्रमाकावर प्राप्त झालेले सात वेळा आलेले ओटीपी विचारुन माझ्या दोन्ही क्रेडीट कार्डमधुन अंदाजे ६७ हजार रुपयाची खरेदी करुन संजय पाटील यांची फसवणुक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स. पो. नि. राकेशसिंग परदेशी हे करीत आहेत.
















