मीरारोड (वृत्तसंस्था) मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी एका इमारतीतील सदनिकेत छापा मारून जुगार खेळणाऱ्या ८ जणांना पकडले असून यात जुगार खेळणाऱ्यात महिलांचा पण समावेश आहे. यावेळी रोख व जुगाराचे साहित्य मिळून ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नया नगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरेंद्र शिंदे व धनंजय गर्जे सह पाटील, थोरात, तारडे, गुरव यांच्या पथकाने रात्री कानूंगो इस्टेट मधील साई पुष्पक इमारतीतल्या एका सदनिकेत मिळालेल्या माहितीच्या आधारे धाड टाकली. त्यावेळी संदेश येलप्पा विरकर (वय ४०) व सोनल रावजी चव्हाण (वय ३७) दोघेही रा. मोगरापाडा, अंधेरी; मंगल प्रसाद शोभनाथ (वय ६२) व किशोर अमृतलाल गडा (वय ५५) दोघेही रा. शांतीनगर सेक्टर ३, मीरारोड; विजय आनंदभाई मांडलिया (वय ४६) रा. एक्सर तलावाजवळ, बोरीवली; मीना शांतीभाई परमार (वय ५२) रा. बेव्हल पार्क, मीरारोड; गिता नितीन रुगानी (वय ५०) रा. मिलाप पीव्हीआरच्या मागे, कांदीवली; शोभा अशोक हरसोरा (वय ५१) रा. कानुंगो इस्टेट, मीरारोड अशी पत्त्यांचा जुगार खेळताना पकडलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. जुगार खेळणाऱ्यात महिलांचा पण समावेश आहे.