जळगाव (प्रतिनिधी) उस्मानिया पार्क परिसरातील टीचर कॉलनीमध्ये तरुणाचे बंद घर फोडून घरातून दोन सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे वस्तू आणि पितळाचे भांडे असा एकूण 8 हजार 500 किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना गुरुवारी 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवार गुन्हा दाखल करण्यात आला.
मुबशीर नासिर पठाण (वय 28, रा. टीचर कॉलनी, उस्मानिया पार्क जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. चहाचा व्यापार करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. 24 जुलै रोजी त्याचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सोन्याच्या दोन अंगठ्या, चांदीच्या वस्तू आणि पितळाचे भांडी असा एकूण 8 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना गुरुवारी 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता समोर आली आहे. याप्रकारे शुक्रवारी 26 जुलै रोजी दुपारी 1 वाजता अज्ञात चोरट्यांवर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील पाटील करीत आहेत.
















