TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी सुरु ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जल्लोषात शुभारंभ

जैवविविधतेचे संवर्धन, स्थानिक रोजगार आणि पर्यावरण पर्यटनासाठी जंगल सफारी महत्त्वाचा टप्पा ठरणार !- पालकमंत्री गुलाबराव पाटील

vijay waghmare by vijay waghmare
August 2, 2025
in जळगाव, वैद्यकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव दि. २ ऑगस्ट ( प्रतिनिधी ) – “सातपुडा जंगल सफारी हा ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा अभिनव संकल्प आहे. या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ही केवळ सफारी नाही, तर सातपुड्याचा आत्मा जपणारी संस्कृती आहे. पाल परिसराला नवा चेहरा मिळणार आहे. तरुणांनी येथे छोटे-मोठे हॉटेल्स, खानावळी उभाराव्यात. प्रत्येक कुटुंबाने एकदा तरी येथे येऊन निसर्गाचा अनुभव घ्यावा; कारण हा श्वास जगण्याचा आनंद शिकवतो,” असे भावनिक आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सातपुडा जंगल सफारीच्या उद्घाटनप्रसंगी केले.*

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी जंगल सफारीत तब्बल दीड तास सहभाग घेत परिसराचा अनुभव घेतला. त्यांच्यासोबत आमदार अमोल जावळे, उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वनसंरक्षक समाधान पाटील आणि वनविभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

कार्यक्रमाच्या सुरुवातीला वन विभागातर्फे पालकमंत्र्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर सफारीदरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती जाणून घेतली.

आमदार अमोल जावळे म्हणाले, “पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून खानदेशातील ही पहिली जंगल सफारी उभारली गेल्याचा अभिमान आहे. येथील निसर्ग जतन करणे आपली सामूहिक जबाबदारी आहे. या परिसरात ‘डार्क स्काय पार्क’ची उभारणी व्हावी, अशी विनंती मी मंत्री पाटील यांच्याकडे केली आहे.

पालकमंत्र्यांनी केली पहिली बुकिंग
जंगल सफारीसाठी एका गाडीचे तिकीट अडीच हजार रुपये आहे. पालकमंत्री यांनी पाच हजार रुपये देऊन दोन गाड्याचे बुकिंग केले. या अर्थाने ते पहिले पर्यटक ठरले. यानंतर दीड तास पालकमंत्री, आमदार आणि अधिकारी यांच्यासह या जंगल सफारीचा आनंद घेतला.

पाल अभयारण्यातील आकर्षण
सातपुडा पाल अभयारण्यात पर्यटकांसाठी अनेक निसर्गसंपन्न आणि अनुभवसमृद्ध ठिकाणे आहेत. यामध्ये लेक व्ह्यू पॉईंट हे विशेष आकर्षण ठरते. डोंगराच्या उंचावरून तलावाचे मोहक दृश्य पाहता येते. निसर्गाच्या सान्निध्यात पक्षी निरीक्षणासाठी हे उत्तम ठिकाण आहे. इको हट पॉईंट हे पर्यावरणपूरक विश्रांतीस्थान असून बांबू आणि स्थानिक नैसर्गिक साहित्य वापरून बांधलेल्या झोपड्यांमध्ये बसण्याची सोय आहे. हे ठिकाण कुटुंबासह शांत वेळ घालवण्यासाठी योग्य आहे. याशिवाय, सनसेट पॉईंट हे सायंकाळच्या वेळेस अप्रतिम सूर्यास्त पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. उंचावरून दिसणारा डोंगराळ भाग, घनदाट जंगल आणि मावळणारा सूर्य यांचे दृश्य मनाला मोहवणारे असते. फोटोग्राफीसाठी हे ठिकाण अत्यंत योग्य आहे. याशिवाय, वाघडोह हे ठिकाण जंगल सफारीतील सर्वात रोमांचक भाग मानले जाते. येथे वाघ, बिबट्या यांच्यासह विविध वन्यजीवांचा अधिवास असून, वन्यप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे आहे. वनविभागाच्या मार्गदर्शकांसह ही ठिकाणे पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेली ही अभयारण्यसंपन्न जागा जैवविविधतेचे संरक्षण, पर्यावरण पर्यटन आणि स्थानिक रोजगारासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

सातपुडा जंगल सफारीचा पहिला टप्पा सुमारे ₹2.5 कोटी निधीतून पूर्ण करण्यात आला असून, प्रारंभी फक्त मूलभूत पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते, पाच सफारी वाहने, १८ प्रशिक्षित गाईड आणि चालकांची नियुक्ती यांचा समावेश आहे. जैवविविधतेचे संवर्धन, स्थानिक रोजगार निर्मिती आणि पर्यावरण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांनी केले. उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी प्रास्ताविकात जंगल सफारीची सविस्तर माहिती दिली, तर सहायक वनसंरक्षक समाधान पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ठळक मुद्दे :
▪️ *स्थानिक तरुणांना पर्यटनातून मिळणार रोजगार
▪️ ‘सातपुडा जंगल सफारी’चे राज्यभरात होणार नावलौकिक

▪️ ‘डार्क स्काय पार्क’साठी आमदार अमोल जावळे यांची मागणी.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: _First Satpura Jungle Safari in North Maharashtra begins; Inauguration with jubilation by Guardian Minister Gulabrao Patil#jalgaon

Related Posts

जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
Next Post

सैन्य दलातील शिपायाची ऑनलाइन ८ लाखांची फसवणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रेयसीचा खून करून प्रियकर पसार ; आईच्या घरासमोरच ठेवला मुलीचा मृतदेह !

September 12, 2024

अमळनेर जी.एस.हायस्कूलला मिळणार ५० लाखांचा निधी !

July 18, 2023

मोठी बातमी ! गुजरातमध्ये कोट्यवधींचं ड्रग्ज जप्त ; ठाण्यातील भाजी विक्रेत्याला अटक !

November 11, 2021

बीएचआर घोटाळा : जाणून घ्या…कोर्टात हजर केलेल्या तिघा संशयित आरोपींवर नेमके काय आहेत आरोप ?

June 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group