चोपडा (लतीश जैन) शहरातील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मेन रोड (सराफ बाजार) येथील लक्ष्मी ज्वेलर्स हे सोने चांदीच्या दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी तीन किलोहून अधिकची चांदी लंपास केली आहे. या घटनेमुळे सर्व सराफ व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोपड्यातील मेन रोडवर हेमंत पूखराज जैन यांचे लक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानामध्ये दोन चोरटे गेले तर तीन चोरटे बाहेर उभे होते, असे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. दुकानच्या वरती राहणारे रहिवाशी जागे झाल्यामुळे त्यांनी आरडाओरड केल्यावर चोरट्यांनी पळ काढला. दुकानातून दोन ते अडीच किलो चांदीचे वस्तू चोरीला गेले असल्याचे दुकानाचे मालक हेमतं जैन यांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक के.के. पाटील हे घटनास्थळी पोहचून सकाळी पाच वाजेपर्यंत त्यांनी चोरीच्या घटनेची चौकशी केली.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज नुसार चोरटे व्हॅगनार कार (MH 09 AQ 1559) मध्ये आले होते. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी परिसरात पोलिसांचे पथक रवाना केली आहेत. तसेच सर्व वाहनांची कसून चौकशी व तपासणी कराण्याचे सबधितांना आदेश दिले आहेत. चोरटे रात्रभर कुठे होते?, म्हणून शहरातील लॉजवर सुध्दा तपासणी करण्याचे काम सकाळपर्यंत सुरू होते. चोपड्यात चोरीत वापरलेली व्हॅगनार कार अमळनेर येथून चोरली असून त्याच गाडीने त्यांनी काल अमळनेर येथे सुद्धा चोरी केली असल्याचे कळते. दरम्यान, चोरटे लवकरात लवकर आपल्या ताब्यात असतील असेही शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी फोनवरून बोलताना सांगितले.