भुसावळ (प्रतिनिधी) भरधाव कार महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकून झालेल्या अपघातात शहरातील महेश नगरातील रहिवासी व औषध विक्रेता राजेश सुरेश भंगाळे (42) यांचा मृत्यू झाला. हा अपघात सुभाष गॅरेजजवळ शनिवार, 20 जानेवारी रोजी रात्री 10. 45 वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी शहर पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली.
भुसावळच्या महेश नगरातील रहिवासी तथा मेडीकल व्यावसायीक राजेश सुरेश भंगाळे (42) हे रात्री जळगावकडून भुसावळात येत असताना रेल्वे उड्डाण पूलावर सुभाष गॅरेजजवळ त्यांची इर्टीका कार (एम.एच.05 सी.व्ही. 9852) पूलाच्या कठड्यावर धडकली. या अपघातात राजेश गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. अपघाताचे वृत्त कळताच मृत राजेश याचे मित्र परिवार हे घटनास्थळी धाव घेतली. भुसावळ ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शहर पोलिस ठाण्यात प्रसन्न धनराज पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद करण्यात आली. मृत राजेश याच्ंयावर रविवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत राजेश याच्या पश्चात आई-वडील, बहिणी असा परिवार आहे.