TheClearNews.Com
Thursday, May 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दरोडेखोरांची टोळी एलसीबीच्या जाळ्यात ; मुक्ताईनगरच्या सराफा व्यावसायिकाला लुटून केला होता पोबारा !

पाच गुन्हे उघड, १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत ; गुप्त माहिती आणि पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी लावला टोळीचा शोध !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील सराफा व्यावसायिकाला नरवेल फाट्याजवळ धारदार शस्त्राने मारहाण करून एका टोळीने १७ लाख ८० हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहिती आणि पुराव्यांच्या आधारे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने टोळीचा शोध लावत पाच संशयितांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

काय घडली होती नेमकी घटना
मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे निलेश वसंत सोनार (वय ३२, रा. नरवेल ता. मुक्ताईनगर) यांचे सोने-चांदीचे दुकान आहे. ते दररोज दुकानातील दागिने आणि पैसे घरी घेऊन जात असतात. दि.३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ते नेहमी प्रमाणे दुकान बंद करून दुकानातील सर्व सोने-चांदीचे दागिने आणि रोकड घेऊन घरी आपल्या दुचाकीवरून परत जात होते. नरवेल फाट्याजवळ एका पल्सरवर चेह-यावर रुमाल बांधून आलेल्या तिघांनी कोणत्यातरी धारदार शस्त्राने व दगडाने मारहान करुन निलेश सोनार यांच्याकडील ९ लाख रुपये किंमतीचे ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ८० हजार रुपये किंमतीचे २ किलोचे चांदीचे दागिने आणि ८० हजार रुपये रोख असा एकूण १० लाख ६० हजाराचा ऐवज बळजबरीने लुटून नेले. हा झटापटीत चोरट्यांनी निलेश सोनार यांच्या हाताला आणि पायाला चाकूसारख्या शस्त्राने वार केल्यामुळे ते जखमी झाले होते.

READ ALSO

बाहेरगावी गेलेल्या शिक्षकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

पाच पथकांनी वेगवेगळ्या मार्गाने गुन्ह्याची जोडली एक-एक कडी
घटना घडल्यानंतर लागलीच एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजन पाटील हे पथकासह रवाना झाले होते. तीन दिवस सलग मागोवा घेत ५ पथकांनी वेगवेगळ्या मार्गाने गुन्ह्याची एक एक कडी जोडली. विशेषतः सर्व पथके रात्रीच्या वेळी कार्य करीत होते. गुप्त माहिती आणि काही पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी एक टोळीचा शोध लावला. सुप्रीम कॉलनीतील तिघांना घरून अटक करण्यात आली तर एक रायपूर कंडारी ता.जळगाव आणि एकाला उचंदा येथून अटक करण्यात आली.

यांनी केला गुन्हा उघड
एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, उपनिरीक्षक गणेश चौभे, सहाय्यक फौजदार रवि नरवाडे, अनिल जाधव, युनुस शेख, हवालदार विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, राजेश गेंडे, सुनिल दामोदरे, सुधाकर अंभोरे, जयंत चौधरी, अशरफ शेख, संदिप पाटील, दिपक पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, संदिप सावळे, पोना किशोर राठोड, रणजित जाधव, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, विजय पाटील, संतोष मायकल, नंदलाल पाटील, भगवान पाटील, श्रीकृष्ण देशमुख, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, रविंद्र पाटील, परेश महाजन, पोकॉ विनोद पाटील, ईश्वर पाटील, दिपक शिंदे, उमेश गोसावी, रमेश जाधव, राजेंद्र पवार, भारत पाटील, दर्शन ढाकणे, अशोक पाटील, मुरलीधर बारी, प्रमोद ठाकुर तसेच मुक्ताईनगर पो.स्टे.चे उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे, पोहेकॉ गणेश मनोरे, पोना मोतीलाल बोरसे, धर्मेंद्र ठाकूर, राहुल महाजन, प्रशांत चौधरी, सतिष भारुडे, लतिफ तडवी अशांनी गुन्हा उघड केला आहे.

पाच संशयित आरोपींना अटक
पथकाने गुप्त माहितीद्वारे विविध ठिकाणी संशयीत आरोपीचे छापे टाकलेले असता एमआयडीसी पो.स्टे. हद्दीत सुप्रिम कॉलनी मध्ये १) सुनिल मिश्रीलाल जाधव (वय-२३ मुळ रा. अंजाळे चिंचखेडा ता.धुळे ह.मु. मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी, जळगाव), २) प्रकाश वसंत चव्हाण (वय ३० मुळ रा. भिकनगाव जि. खरगौन (म.प्र.) ह.मु. रामदेव बाबा मंदिर जवळ सुप्रिम कॉलनी, जळगाव), ३) आकाश दिलीप पवार (वय २४ मुळ रा. लोणवाडी ता. जळगाव, ह.मु.भवानी चौक सुप्रिम कॉलनी, जळगाव) यांना आज दि.४ रोजी शिताफिने ताब्यात घेतल्यानंतर त्यांना एमआयडीसी पो.स्टे. ला चौकशी कामी आणले असता त्यांनी मुक्ताईनगर पो.स्टे. हद्दीत नरवेल रोडवर एका सोनारास लुट्न त्यांचे जवळील सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याची माहिती दिली. तसेच गुन्हयांत अजून त्यांचे साथीदार ४) विशाल देविदास मराठे (रा. रायपुर कंडारी ता. जळगाव), ५) विनोद विश्वनाथ इंगळे )रा. उचंदा ता. मुक्ताईनगर) हे सुध्दा असल्याचे सांगितले असता पोलिसांनी त्यांच्या देखील मुसक्या आवळल्या.

इतर गुन्ह्यांची कबुली
ताब्यात घेतलेल्या १) सुनिल मिश्रीलाल जाधव वय २३ मुळ रा. अंजाळे चिंचखेडा ता. धुळे ह.मु. मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी, जळगाव, २) प्रकाश वसंत चव्हाण वय ३० मुळ रा.भिकनगाव जि.खरगौन (म.प्र.), ह.मु. रामदेव बाबा मंदिर जवळ सुप्रिम कॉलनी, जळगाव, ३) आकाश दिलीप पवार वय २४ मुळ रा. लोणवाडी ता. जळगाव, ह.मु. भवानी चौक सुप्रिम कॉलनी, जळगाव यांना अधिक विचारपुस करता त्यांनी कबुल केले की, त्यांनी सुमारे मागील ८/९ महिन्यात १) पळासखेडा से बोदवड २) वराड ते विटनेर रोडवर, ३) लासगाव ते बांबरुड रोडवर, ४) वराड ते रोडवर मोटार सायकलस्वार यांना अडवून त्यांचे कडून रोख रुपये व मोबाईल असे हिसकावून चोरी केल्याचे सांगितले.

पथकाने आणखी चौकशी केली असता जामनेर पो.स्टे. गु.र.नं. १५९/ २०२२ भादंवि क. ३७९, ३४ प्रमाणे दाखल असुन त्यात १ लाख ११ हजार ८४१ रुपये रोख व ४ हजार रुपयाचे २ मोबाईल असा एकूण १ लाख १५ हजार ८४९ रुपये चोरी गेलेले होते. हा गुन्हा संशयित आरोपी आकाश दिलीप पवार, सुनिल मिश्रीलाल जाधव व त्याचा एक साथीदार (१) मनिष सुभाष चव्हाण (रा. लोणवाडी ता.जळगाव) अशांनी केल्याचे संशयित आरोपी आकाश दिलीप पवार यांने कबुल केले आहे.

एमआयडीसी पो.स्टे. गु.र.नं. २१५/२०२२ भादंवि क.३९४,३४ आर्म ऍक्ट ३/२५ प्रमाणे दाखल असून सदर गुन्हयांत ९५ हजार ८७३ रुपये रोख व एक सॅमसंग कंपनीचा टॅब असा एकूण १ लाकः १४ हजार ६२९ रुपयाचा माल चोरी गेलेला होता. हा गुन्हा आरोपी सुनिल मिश्रीलाल जाधव (वय २३ मुळ रा. अंजाळे चिंचखेडा ता. धुळे ह.मु.मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी, जळगाव) व त्याचे साथीदार दिलीप पवार, सागर कंजर (विशाल बागडेचा भाचा) (रा. कंजरवाडा, जळगाव) अशांनी केल्याचे आरोपी सुनिल जाधव व आकाश पवार यांनी कबूल केले आहे.

एमआयडीसी पो.स्टे. गु.र.नं. ३५२/२०२२ भादंवि क.३९४ प्रमाणे दाखल असून सदर गुन्हयांत १ लाख ७ हजार १५८ रुपये रोख व १ मोबाईल असा एकूण १ लाख २२ हजार १५८ रुपयाचा माल चोरी गेलेला होता. हा गुन्हा आकाश दिलीप पवार, सुनिल मिश्रीलाल जाधव व सागर कंजर (विशाल बागडेचा भाचा) (रा.कंजरवाडा, जळगाव) अशांनी केल्याचे आरोपी सुनिल जाधव व आकाश पवार यांनी कबुल केले आहे.

पाचोरा पो.स्टे. गु.र.नं. १४९/२०२२ भादंवि क.३९२३४ प्रमाणे दाखल असून सदर गुन्हयांत १ लाख ८९ हजार ६२० रुपये रोख चोरी गेलेला होता. हा गुन्हा आकाश दिलीप पवार, सुनिल मिश्रीलाल जाधव यांनी त्यांचे साथीदार विशाल विजयसिंग बागडे (रा.कंजरवाडा, जळगाव), व दिपक शर्मा (कुसूंबा ता.जळगाव) अशांनी केल्याचे आरोपी सुनिल जाधव व आकाश पवार यांनी कबुल केले आहे. त्यात आरोपी विशाल विजयसिंग बागडे (वय ३० रा. कंजरवाडा, जळगाव) यास सुध्दा ताब्यात घेण्यात आले असून त्यास पाचोरा पो.स्टे.गु.र.नं.१४९/२०२२ भादंवि क.३९२, ३४ या गुन्हयांत पुढील तपास कामी हजर करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या शिक्षकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

May 28, 2026
गुन्हे

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

May 28, 2026
गुन्हे

गर्भलिंग निदानाचे रॅकेट चालविणाऱ्यांवर होणार मकोकातंर्गत कारवाई

May 27, 2026
गुन्हे

मनरेगा घोटाळ्याची तक्रार करणाऱ्यावर पारोळ्यात कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; १२ जणांवर गुन्हा दाखल

May 27, 2026
गुन्हे

ओडिशातील खून, ५ कोटींच्या खंडणी प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

May 26, 2026
गुन्हे

सबगव्हाण येथे दोन गटात तुंबळ हाणामारी; ६ जणांविरुद्ध गुन्हा

May 26, 2026
Next Post

महात्मा गांधी उद्यानाचे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण ; स्व. सलीम पटेल यांची स्वप्नपूर्ती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरात मंत्री अनिल पाटलांची डोकेदुखी वाढली ; अपक्ष उमेदवार अनिल पाटलांचा अर्ज दाखल !

October 30, 2024

जिल्ह्यात आज आढळले ३१ कोरोनाबाधित, २६ झाले बरे !

January 17, 2021

फेसबुकवरील मैत्री तोडणं पडलं महागात ; माथेफिरूनं घरात घुसून केली तरुणीची हत्या 

June 22, 2022

मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात ; लघुशंकेला उतरलेल्या तिघांना ट्रेलरने उडवलं

January 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group