धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर ठिकठिकाणी अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीला पिडीत मुलीसह पोलिसांनी शिर्डी येथून ताब्यात घेतले. संशयिताला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. समाधान दंगल पाटील (25) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला गावात राहणारा समाधान पाटील याने ५ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून पळवून नेले होते. चोपडा येथून सुरत येथे गेल्यानंतर नातेवाईकांकडे दोघं जण काही दिवस राहिलेत. समाधान पाटील याने मुलीला शिर्डी येथे घेवून गेला. त्या ठिकाणी एका झोपडीत राहून तिच्यावर अत्याचार केला. २५ जुलै रेाजी दोघे शिर्डी बसस्थानकात असतांना शिर्डी पोलिसांनी दोघांना संशयित म्हून ताब्यात घेतले. त्यानंतर धरणगाव पोलिसांसोबत संपर्क केला. त्यानंतर दोघांना धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. संशयित आरोपी समाधान पाटील याला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 30 जुलैपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.