धरणगांव प्रतिनिधी –
धरणगाव : शहरातील उड्डाणपुलाला भारतातील थोर समाज सुधारक, भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका – शिक्षिका, कवयित्री, सत्यशोधिका क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले उड्डाणपूल असे नाव देण्यात आले आहे. उड्डाणपुलाला दिलेले सावित्रीमाईंचे नाव अतिशय धूसर व पुसट झालेले आहे. येणाऱ्या ३ जानेवारीला “सावित्रीमाईंचा जन्मोत्सव” संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा होतो. याच दिवशी महाराष्ट्रात महिला शिक्षण दिन, महिला मुक्ती दिन, बालिका दिन मोठ्या उत्साहाने साजरे होतात. म्हणूनच सत्यशोधक समाज संघाच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी सो. यांना निवेदनाच्या माध्यमातून येत्या दोन-तीन दिवसात नव्याने टाकण्यात यावे या संदर्भात नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक पारधी सो. यांना देण्यात आले. याबाबत उड्डाणपुलावरील पुसट दिसणारे नाव लवकरात लवकर नव्याने टाकण्यात येईल असे आश्वासन पारधी साहेब यांनी दिले. याप्रसंगी सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील, संघटक राजेंद्र वाघ, गोरखनाथ देशमुख, एच डी माळी, भागवत चौधरी, लक्ष्मणराव पाटील, विनोद रोकडे, रणजित शिकरवार, पवन महाजन, विक्रम पाटील, दिनेश भदाणे, रामचंद्र माळी, मयूर भामरे, आकाश पांचाळ, राहुल महाजन, कुणाल सोनार, राहुल पाटील, भैय्या धनगर, संदीप फुलझाडे, राजेंद्र भोई तसेच सत्यशोधक समाज संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी धरणगाव पोलिस स्थानकाचे पी.एस.आय. संतोष पवार यांसह पोहेकॉ संजय सूर्यवंशी, पोहेकॉ सत्यवान पवार, पोहेकॉ चंदन पाटील, पोहेकॉ समाधान भागवत आदी उपस्थित होते.