निफाड (वृत्तसंस्था) येथील कादवा नदी पुलावर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या पथकाने अंदाजे १० लाखांचा २०० किलो गांजा पकडल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, कारवाई करणाऱ्या पथकामध्ये जळगावच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी नाशिक परिक्षेत्रातील अवैध धंद्यांवर कारवाईसाठी नेमलेल्या पथकाला गांजा तस्करी संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने निफाड पोलीस ठाणे हद्दीतील शांतीनगर त्रिफुलीजवळ कादवा नदी पुलाजवळ सापळा रचला होता. वाहनांची तपासणी करत असताना पथकाला संशयित सूरज राम शिंदे (वय २४, रा. गंगापूर रोड, नाशिक) व त्याचा साथीदार अजय संतोष पवार (वय २४, रा. राणेनगर, सिडको), अनोळखी व्यक्ती (रा. विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश), तुषार भोसले (रा. नाशिक) व इतर साथीदारांना गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे जवळ बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असताना आढळून आले. त सर्व मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे १४ लाख ८६ हजार ६५० रुपये असून त्यात १ लाख ८२ हजार ६५० किमतीचा १९६ किलो ३३ ग्रॅम वजनाचा गांजा, ४ लाख ५० हजारांची जीप व ५५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण मुद्देमालाचा समावेश होता. याबाबत सचिन दिलीप धारणकर यांच्या फिर्यादीवरून निफाड पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पथकात यांचा होता समावेश
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई त्यांच्या विशेष पथकातील पोलीस बापू रोहम, सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव व अंमलदार पथकातील एएसआय बशीर गुलाब तडवी (जळगाव), पोलीस हवालदार रामचंद्र बोरसे (जळगाव), मनोज दुसाने (जळगाव), पोलीस नाईक प्रमोद मंडलिक, कुणाल मराठे, सुरेश टोंगारे, सचिन धारणकर,शकील शेख व निफाड पोलीस ठाण्यातील आनंद पटारे, पोलीस नाईक मनोज आहेर, पोलीस नाईक विलास बिडगर, जयकुमार महाजन, पोलीस शिपाई सागर सारंगधर, पोलीस शिपाई राजेंद्र दरोडे, पोलीस नाईक त्र्यंबक पारधी, संदीप खडीकर, एएसआय गोसावी, पोलीस हवालदार जगताप, पोलीस हवालदार विठ्ठल बोरसे, पोलीस शिपाई विनायक राऊत, अनिल वाणी यांनी केली.