जळगाव (प्रतिनिधी) चांगले कर्म हे अल्लाच्या प्रती समर्पण भावनेतून केल्यास त्यातून परलोकी स्वर्ग प्राप्त होतो असा संदेश पवित्र कुरान ने दिला आहे. या तत्वाला अनुसरून जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरी ने पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त समाजातील घटस्फोटीत, पीडित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील दहा महिलांना शिलाई मशीन व दोन महिलांना आर्थिक साहाय्य देऊन एकूण ८३ हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य केले.
अनोखी भवांजली -फारूक शेख
जळगाव मानियार बिरादरीची ही अनोखी भावांजलि असून भाऊंनी महिला सक्षमीकरणासाठी जे प्रयत्न केले त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज त्यांच्या जयंती निमित्त ८३ हजार रुपयाचे महिलांना आर्थिक सहाय्य करून भावांजलि वाहत असल्याचे प्रतिपादन मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी आपल्या प्रास्ताविकात द्वारे केले.
महापौर भारती सोनवणे
दररोजच्या २४ तासात आपण किती जीवांना सूखाऊ शकलो हाच विचार विश्रांती पूर्वी जे करतात तेच जगाचा कल्याणाचा विचार करतात किंवा करू शकतात हेच विचार श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्या भाऊंच्या कृती संपन्नतेचा आदर्श होय अशा प्रकारे महापौर भारतीय सोनवणे यांनी आपल्या भावना अध्यक्षीय भाषणात भावना व्यक्त केल्या.
डॉ. प्रणल चौधरी
जिथे जिथे चांगले काम होत आहे तिथे तिथे आपलेही योगदान द्यावे चांगले काम हे ईश्वराचेच असते. असे भावोद्गार प्रणल सुयोग चौधरी यांनी व्यक्त केले.
मनियार बिरादरीची भाऊंना भावांजलि
८३ व्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरी ने रथ चौक येथील कार्यालयात एक छोटेखानी कार्यक्रम घेतला व त्या कार्यक्रमात दहा महिलांना शिलाई मशीन देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केला तर दोन महिलांना ज्यांना आर्थिक मदतीची गरज होती त्यांना आठ हजार रुपये देऊन सहकार्य केले. अशाप्रकारे पंच्याहत्तर हजार रुपयाच्या शिलाई मशीन व आठ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य असे मिळून एकूण ८३ हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य महिलांना करून मोठ्या भाऊंना ८३ व्या जयंतीची भावांजली वाहण्यात आली.
महापौर भारती सोनवणे, नगरसेविका रंजना सपकाळे, नगरसेवक कैलास अप्पा सोनवणे, नगरसेवक चे प्रतिनिधी भरत सपकाळे, डॉ. प्रणल चौधरी, डॉक्टर सुयोग चौधरी तर बिरादरी तर्फे फारुक शेख, सय्यद चाँद, सय्यद जुबेदा, जरा सलीम, सलमा युनूस, नाजमीन असलम, नसीम फारूक, जरीना रऊफ, शहनाज यासीन, नसरीन शकील यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम शबीना हरीश यांनी पवित्र कुराणाचे पठण केले फारुक शेख यांनी प्रास्ताविक सादर केले तर यास्मिन सय्यद यांनी आभार मानले.