धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री खु येथील तरुणाला जुना वादावरून शिवीगाळ करत हॉकी स्टिकने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तसेच तरुणाच्या आई-वडील व पत्नीलाही चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंप्री खु येथील मारवाडी गल्लीत हरीष संदिप पांडे (वय 29 वर्ष, व्यवसाय व्यापार) हे वास्तव्यास आहेत. हरीश पांडे हे सुवर्णसिंग महाले यांच्यासोबत मोटर सायकलीने जात असतांना रामु उर्फ रमेश पांडे याने त्यांच्या शेतीचा ताबा न देण्याचा जुन्या वादावरून असलेला जुना राग मनात ठेवून माझाकडे काय पाहतो असे हरीश पांडे यांना बोलला. तसेच हरीश पांडे यांच्या आई, वडील व पत्नी यांना शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तर रामु उर्फ रमेश मिश्रीलाल पांडे याने हॉकी स्टिकने हरीश पांडे यांना मारहाण केली. व देव दिनेश पांडे, चेतन संजय पांडे, केतन संजय पांडे यांनी दगडे व विटा हरीश पांडे यांच्या घरावर फेकुन दहशत निर्माण केली. याप्रकरणी हरीश पांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामु उर्फ रमेश मिश्रीलाल पांडे, चेतन संजय पांडे, मनोज मिश्रीलाल पांडे, दिनेश मिश्रीलाल पांडे, केतन संजय पांडे, देव दिनेश पांडे, मंगला संजय पांडे, जया रमेश पांडे, जयश्री दिनेश पांडे (सर्व रा. पिंप्री, ता. धरणगाव) अशा नऊ जणांविरुद्ध धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोहेकों नितीन पाटील हे करीत आहेत.