बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील वडजी येथील सिद्धार्थ प्रकाश सपकाळे (वय २५) या तरुणाने शेतातील निंबाच्या झाडाच्या फांदीवर दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
सिद्धार्थ सपकाळे याने भागवत इंगळे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाच्या फांदीवर दोर बांधून गळफास घेतल्याची घटना दुपारी बाराचे सुमारास उघडकीस आली. मयत सिद्धार्थ कुटुंबातील सर्वात लहान होता. त्याच्या पश्चात आई ,वडील, मोठा भाऊ व विवाहित बहिणी असा परिवार आहे.या घटने बाबत मयताचा भाऊ विनोद प्रकाश सपकाळे याच्या खबरीवरून बोदवड पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यू नोंद झाली असून पुढील तपास हे.कॉ.वसंत निकम हे करीत आहेत.















