मुंबई (वृत्तसंस्था) अलहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. शाळेच्या दाखल्यावर जन्म तारखेचा उल्लेख असेल तर आधार कार्ड आणि पॅन कार्डला वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरावेच असं बंधनकारक नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती रोहित राजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने एका सुनावणीदरम्यान हा निकाल दिला आहे.
आधारकार्ड, पॅनकार्ड जन्मतारखेचा वैध पुरावा नाही, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. आधारकार्ड पॅनकार्डच्या माध्यमातून जन्मतारखेचा दाखला ग्राह्य धरता येणार नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. वय ठरवण्यासाठी शाळेच्या दाखल्यावरील जन्मतारीख ग्राह्य धरली जाऊ शकते, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मेरठमधील एका सुनावणीत न्यायमूर्ती रोहित राजन अग्रवाल यांनी हा निकाल दिला.
एका दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी दरम्यान हा निकाल दिला आहे. लग्नासंदर्भातील या याचिकेमध्ये अर्जदारांनी २८ फेब्रुवारी २०२१ रोजी आपण सज्ञान होतो, त्यामुळेच न्यायालयाने आमचा जगण्याचा आणि खासगी स्वांत्र्याच्या हक्कांचं संरक्षण करावे, अशी मागणी केली. तसेच इतर कोणीही आमच्या खासगी वैवाहिक आयुष्यात ढवळाढवळ करु नये, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.
दरम्यान, संबंधित मुलीच्या आईने न्यायालयासमोर दिलेल्या जबाबामध्ये शाळेच्या दाखल्यावरील तारीख योग्य असल्याचा आधार घेत न्यायालयाने शाळेच्या दाखल्यावरील तारीख बरोबर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आधारकार्डवरील किंवा वैद्यकीय चाचण्यांच्या अहवालाला प्राधान्य देता येणार नाही. २०१९ मधील एका निकालाच्या आधारे आधार कार्ड हा वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नसल्याचे न्यायालायने स्पष्ट केले.