TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘आप’चे नेते मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर ; १७ महिन्यांनंतर आले तुरुंगाबाहेर !

vijay waghmare by vijay waghmare
August 10, 2024
in राष्ट्रीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) वादग्रस्त मद्य धोरण संबंधित कथित घोटाळा व हवालाकांडप्रकरणी आम आदमी पक्षाचे (आप) नेते मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला व तब्बल १७ महिन्यांनंतर ते तुरुंगाबाहेर आले. यावेळी आपच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.

आम आदमी पक्षाचे दिल्लीतील कार्यालय व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून व ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला. राज्यघटना व लोकशाहीमुळेच मला जामीन मिळाल्याची प्रतिक्रिया सिसोदिया यांनी दिली. आपल्याला मिळालेला जामीन हा हुकूमशाहीला सनसनीत चपराक असल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. बी. आर. गवई व न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने म्हटले की, आरोपी मनीष सिसोदिया हे गेल्या १७ महिन्यांपासून कोठडीत आहेत. त्यांच्या विरोधात अंमलबजावणी व केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (सीबीआय) दाखल केलेल्या प्रकरणी अद्यापही सुनावणी सुरू झालेली नाही. त्यामुळे तातडीने सुनावणीच्या अधिकारापासून सिसोदिया वंचित झाले आहेत. आता त्यांना जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयाकडे पाठवणे योग्य ठरणार नाही.

READ ALSO

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

जामीन मंजूर करणे हा नियम आहे तर तुरुंगवास हा अपवाद आहे. ही बाब उच्च न्यायालय व कनिष्ठ न्यायालयांनी समजून घेतली पाहिजे, अशा शब्दांत खंडपीठाने तपास संस्थांना फटकारले. आरोपी मनीष सिसोदिया यांना १० लाख रुपयांचा जातमुचलका व तेवढ्याच रकमेच्या दोन रोख्यांवर जामीन देण्याचा फैसला सुनावत आहोत, असे खंडपीठाने स्पष्ट केले. सिसोदियांनी तुरुंगाबाहेर असताना पुराव्यांशी छेडछाड करू नये. कोणत्याही साक्षीदारावर प्रभाव टाकू नये. त्यांनी स्वतःचा पासपोर्ट जमा करावा, जामिनावर असताना सिसोदिया यांनी प्रत्येक सोमवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावावी, असे खंडपीठाने बजावले आहे.

दरम्यान, मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आपचे नेते व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. दिल्लीच्या दीनदयाल उपाध्याय मार्गावरील आपचे कार्यालय व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी जल्लोष करण्यात आला. मनीष सिसोदिया यांची पत्नी सीमा व कुटुंबीयांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता, आपचे नेते सौरभ भारद्वाज, आतिशी, राघव चड्डा यांच्यासह अनेक नेत्यांनी आनंद व्यक्त केला. विशेष बाब अशी की, मनीष सिसोदिया यांना सीबीआयने २६ फेब्रुवारी २०२३ तर अंमलबजावणी संचालनालयाने ९ मार्च २०२३ रोजी मद्य धोरण संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी अटक केली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
Next Post

शेत रस्त्याच्या समस्यांबाबत आपसातील वाद सामंजस्याने सोडवावेत : महेंद्र सूर्यवंशी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवत दोन बहिणींची फसवणूक !

October 7, 2024

फेसबुकवरील मित्राकडून घात ; अत्याचाराचा व्हिडीओ बनवून केली १० लाखांची मागणी !

December 4, 2021

परमपूज्य संतशिरोमणी १०८ आचार्यश्री विद्यासागरजी महामुनिराजांना धरणगावात विनयांजली अर्पण !

February 25, 2024

गर्भवती विवाहितेचा ओढणीने गळा आवळून सासरच्यांनी केला खून ; कारण वाचून तुमच्या तळपायाची आग जाईल मस्तकात !

April 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group