TheClearNews.Com
Saturday, November 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

प्रामुख्याने शेतकऱ्यांसह इतर वीजग्राहकांनाही सोय उपलब्ध

vijay waghmare by vijay waghmare
October 6, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत चमकलेल्या हिमाली बोरोले व ममता प्रजापत यांच्यासह शौर्य चौधरीचा गौरव!

कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणारा गजाआड

जळगाव (प्रतिनिधी) – राज्यातील प्रामुख्याने शेतकरी आणि सर्वसामान्य वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोणत्याही भागातील नादुरुस्त किंवा बंद पडलेल्या रोहित्राची (ट्रान्सफॉर्मर) माहिती थेट ‘महावितरण मोबाईल अ‍ॅप’द्वारे एका क्लिकवर देण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे नादुरुस्त रोहित्र ताबडतोब बदलणे किंवा दुरुस्त करणे लवकर शक्य होणार आहे. या अॅपद्वारे कोणालाही कोणत्याही ठिकाणच्या नादुरुस्त रोहित्राची माहिती देता येईल, हे विशेष. यासह महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईटवर किंवा कॉल सेंटरमध्ये देखील तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध आहे.
महावितरणने नादुरुस्त रोहित्र बदलण्यासाठी राज्यभरात यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तथापि, नादुरुस्त किंवा बंद पडलेल्या रोहित्राची माहिती प्राप्त होण्यास विलंब होत असल्याचे दिसून आले. त्याची गंभीर नोंद घेत मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी नादुरुस्त रोहित्रांची माहिती कळविण्यासाठी नागरिकांना ‘महावितरण मोबाईल अॅप’द्वारे खास सोय उपलब्ध करून देण्याची सूचना केली. त्याप्रमाणे ही सुविधा अॅपवर कार्यान्वित झाली आहे.
महावितरणकडून राज्यभरातील ९ लाख २५ हजार वितरण रोहित्रांचे (डीटीसी) जिओ लोकेशनसह मॅपींग पूर्ण झाले आहे. त्यामुळे केवळ लोकेशनच्या आधारे नादुरुस्त रोहित्रांची माहिती देणे कोणालाही ‘महावितरण मोबाईल अॅप’द्वारे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे हे अॅप डाऊनलोड केलेल्या सर्व मोबाईलधारकास कोणत्याही ठिकाणच्या बंद किंवा नादुरुस्त रोहित्रांची माहिती कळविण्याची सोय मराठी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी ‘प्ले स्टोअर’ किंवा ‘अॅपल स्टोअर’वर उपलब्ध आहे.
नादुरुस्त रोहित्राची अशी करा तक्रार : ‘महावितरण मोबाईल अॅप’मध्ये ग्राहक क्रमांकासोबत लॉगिन किंवा लॉगिन न करता गेस्ट म्हणूनही नादुरुस्त रोहित्राची माहिती कळवता येईल. ही माहिती कळविताना संबंधित नादुरुस्त रोहित्राच्या ठिकाणाजवळ असणे मात्र आवश्यक आहे. या अॅपमध्ये मुख्य पानावर ‘नादुरुस्त रोहित्राची माहिती नोंदवा’ या रकान्यावर क्लिक केल्यास पुढील पानावर नाव आणि व्हॉटस् अॅपचा मोबाईल क्रमांक (लॉगिन नसल्यास) विचारला जाईल. तत्पूर्वी या अॅपमधील लोकेशन परमिशन ‘ऑन’ असणे आणि मोबाईल संचाचे लोकेशन सुरू करणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक दिल्यानंतर ओटीपी निर्माण करण्यास सांगितले जाईल. हा ओटीपी संबंधितांना व्हॉटस् अॅपवर प्राप्त होईल. ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर एका चौकटीत नादुरुस्त किंवा बंद रोहित्राचा ‘फोटो काढा’ असा पर्याय येईल. संबंधित नादुरुस्त रोहित्राचा केवळ फोटो काढावा. या चौकटीखालीच एका नकाशामध्ये अक्षांश-रेखांशासह रोहित्राचे रेखाचित्र, रोहित्राचे नाव व क्रमांक (डीटीसी नंबर) दिसेल. एकापेक्षा अधिक रोहित्र असल्यास जे नादुरुस्त आहे त्यावर क्लिक करता येईल. त्यानंतर ‘नोंद करा’ (सबमीट) पर्याय क्लिक केला की ही माहिती तात्काळ संबंधित कार्यालयातील अभियंता व जनमित्रांना मोबाईल संदेशाद्वारे प्राप्त होईल व रोहित्राची तपासणी करण्यात येईल. लहान दोष असल्यास रोहित्राची तात्काळ दुरुस्ती करण्यात येईल किंवा रोहित्र नादुरुस्त असल्यास ते ताबडतोब बदलण्यात येईल. रोहित्र दुरुस्त झाले किंवा बदलले याबाबत संबंधित तक्रारकर्त्यांना देखील व्हॉटस् अॅपद्वारे कळविण्यात येणार आहे.
महावितरणच्या वेबसाईट किंवा कॉल सेंटरद्वारे तक्रारीची सोय : मोबाईल अॅपसोबतच नादुरुस्त रोहित्राची तक्रार किंवा माहिती देण्याची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर, संबंधित कार्यालय किंवा ग्राहक सुविधा केंद्रामध्ये किंवा २४ तास सुरु असलेल्या १८००-२१२-३४३५/ १८००-२३३-३४३५/ १९१२ किंवा १९१२० या टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध आहे. वेबसाईटवर ग्राहक रकान्यात जाऊन ‘ऑनलाइन तक्रार नोंदवा’मध्ये ग्राहक क्रमांकाशी संबंधित रोहित्र नादुरुस्त झाल्याची तक्रार नोंदविता येईल. यासह या वेबसाईट किंवा महावितरण मोबाईल अॅपवरील ‘ऊर्जा चॅट बॉट’द्वारे देखील इतर तक्रारींसोबतच मराठी व इंग्रजी संवादाद्वारे तक्रार दाखल करण्याची सोय उपलब्ध आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonInformation on faulty transformers available with a single click; special feature on the ‘Mahavitaran Mobile App’

Related Posts

क्रीडा

आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत चमकलेल्या हिमाली बोरोले व ममता प्रजापत यांच्यासह शौर्य चौधरीचा गौरव!

November 21, 2026
गुन्हे

कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणारा गजाआड

November 20, 2026
जळगाव

महावितरणच्या अभय योजनेत जळगाव परिमंडलातील ३ लाख ९२ हजार ग्राहकांना थकबाकीमुक्तीची संधी!

November 19, 2026
गुन्हे

दोन दिवसांपूर्वीच घरी आलेल्या तरुणाचा पाठीत चॉपर खूपसून निघृण खून

November 19, 2026
जळगाव

राज्य नाट्य स्पर्धा : जळगावकर नाट्यरसिकांना मिळणार नाट्यप्रयोगांची मेजवानी

November 18, 2026
जळगाव

महावितरणच्या प्रगतीत लेखा विभागाचे मोलाचे योगदान

November 18, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कांगारुंना झटका : डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतून बाहेर

November 30, 2020

‘त्यांनी’ वीजबिल भरले अन् जनतेला सांगतात भरू नका – राऊत यांची विरोधकांवर टीका

November 27, 2020

कोणता झेंडा घेऊ हाती ? शिंदे सेनेच्या उमेदवारांची किशोर पाटलांच्या भूमिकेमुळे उद्दीन प्रतिक्रिया, शिवसेनेच्याच उमेदवाराच्या विरोधात शहर विकास आघाडीचा प्रचार करणार

November 28, 2025

विठूनामाच्या गजरासह पर्यावरणाचा जागर ; आषाढीनिमित्त महिला मंडळ शाळेची वृक्षदिंडी !

June 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group