जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव जिल्ह्यामध्ये अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ‘सिंधूताई सपकाळ’ यांचे मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटाने ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने हजारो अनाथ बालकांची माय हरपली असल्याकारणाने महाराष्ट्र मध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अभाविप तर्फे जिल्हाभरात माईंना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
जिल्ह्यात जळगाव, महानगरांमध्ये नूतन मराठा महाविद्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच एरंडोल येथील डी.डी.एस.पी महाविद्यालयामध्ये माईंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य तसेच महाविद्यालयीन सर्व विद्यार्थी उपस्थित होते. अमळनेर तालुक्यामध्ये प्रताप महाविद्यालय येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे, तसेच माई शरीराने जरी आपल्यामध्ये नसेल तरी विचाराने, कृतीने व कार्याने माई आपल्यामध्ये चिरकाल जिवंत आहेत. माई म्हणजे चालते – बोलते विद्यापीठ होत्या. त्यांच्या ज्ञानाची ज्योत कधीही न मावळनारी आहे, असे उदगार जिल्हा संयोजक ईच्छेश काबरा यांनी माईंना श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केले. यावेळी नगर मंत्री मयूर माळी,अमळनेर शहर मंत्री अमोल पाटील, चैत्राली बाविस्कर, ईशा पाटील, आरती पाटील, अक्षद शहा, अश्विन पाटील, वरद विसपुते, जय जगताप, आदीसह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.