धरणगाव (प्रतिनिधी) जानेवारी २०२० मध्ये केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालय दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय परीक्षेत आदर्श प्राथमिक शाळा, पिंप्री खुर्द ता. धरणगाव जि जळगाव येथील तागेश भागवत रामटेके व प्रथमेश गुलाब शिंपी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांना त्यांचे वर्गशिक्षक बी .एन.पाटील, उपशिक्षक, एस.के. शिंदे, आर.एस.पाटीलयांचे मार्गदर्शन लाभले. यशा बद्दल धरणगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली चौधरी, आर.आर. पावरा, पी.ए. चौधरी, जे.एस. हडप, एस.ए. पटेल यांनी अभिनंदन केले.
तसेच संस्थाअध्यक्ष मधुकर चौधरी, सचिव विनोद चौधरी, यांनी शाळेच्या यशाबद्दल सर्व शिक्षकांचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल परिसरात त्याचे कौतुक होत आहे.