TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लातूरमध्ये अग्नीतांडव ; आई, मुलगा आणि सुनेचा गुदमरून मृत्यू !

तिघांनी गॅलरीच्या लोखंडी पाईपला साडी बांधून उतरले खाली !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 27, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

लातूर (वृत्तसंस्था) चार मजली इमारतीत लागलेल्या आगीमुळे प्रचंड धूर निर्माण झाला होता. आजूबाजूला शॉपिंग कॉम्पलेक्स आणि बाजारपेठ असल्याने मोकळी जागाही नव्हती. त्यामुळे धुरात गुदमरून आई मुलगा आणि सून हे तिथे मृत्युमुखी पडले. सुनील शिवाजीराव लोंढे (वय ५८), कुसूमबाई शिवाजीराव लोंढे (वय ८०) आणि प्रमिला सुनील लोंढे (वय ५०), अशी मयतांची नावे आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाणपुलाजवळील मुख्य रस्त्यावर शिवाई नावाची इमारत आहे. बहुमजली असलेल्या या इमारतीत खालच्या दोन मजल्यांवर व्यावसायिक दुकाने व वरच्या दोन मजल्यांवर सदनिका तयार करण्यात आल्या आहेत. या इमारतीतील एका सदनिकेत सुनील शिवाजीराव लोंढे (वय ५८) हे आपल्या कुटुंबीयांसमवेत राहत होते. गुरूवारी सकाळी सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यातील फुलांचे हार, बुके याच्या दुकानात शॉर्ट सर्किट झाले. यामुळे दुकानातील प्लास्टिक व कागदी साहित्याने पेट घेतला. सकाळच्यावेळी पेट घेतल्याने दुकानेही बंद होती.

READ ALSO

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

दुकानातील साहित्य पेटण्याने धुराचे लोट सुरू झाले. त्याचबरोबर वायरिंगचे शॉर्ट सर्किट होत संपूर्ण इमारतीच्या वरच्या मजल्यापर्यंत गेले. खालच्या मजल्यातील प्रचंड धुरामुळे आगीच्या ज्वाळाही भडकू लागल्या. त्यांना वाटच मिळत नसल्याने इमारतीच्या जिन्यावरून या ज्वाळा वरच्या मजल्यापर्यंत भडकत गेल्या. वायरच्या जळण्याने उग्र वास व धुराचे लोट इमारतीत निर्माण झाल्याने ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले. हे भयावह दृश्य पाहून दुसऱ्या मजल्यावर राहणारे मयत सुनील लोंढे हे त्यांच्या आई कुसूमबाई लोंढे व पत्नी प्रमिला लोंढे यांना सोबत घेऊन पायऱ्यांतून खाली येण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु, धुराचे प्रचंड लोट व आगीच्या ज्वाळांचेही निखारे येत असल्याने पायऱ्या उतरत असतानाच तिघांचाही मृत्यू झाला. तिन्ही मृतदेह पायऱ्यांवरच असल्याचे अग्निशामकच्या जवानांना दिसून आले.

घटना घडताच अवघ्या दहा मिनिटात अग्निशामक विभागाची गाडी आग विझविण्यासाठी दाखल झाली. त्यांनी खालच्या मजल्यावरील आग विझविली. परंतु, धुराचे लोट असल्यामुळे त्यांनाही वरच्या मजल्यावर जाता आले नाही. धूर कमी झाल्यानंतर वर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाटेतच सदर तिघांचे मृतदेह आढळून आले. यादरम्यान धुराचे लोट पाहून शेजारच्या घरातील तिघांनी गॅलरीच्या लोखंडी पाईपला साडी बांधून खाली येण्याचे धाडस दाखविले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
Next Post

परिस्थिती असताना कर्ज फेड न करणे यात फक्त बॅंकचे नव्हे तर समाजाचे नुकसान : अरुणभाई गुजराथी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

August 22, 2026

भुसावळ शहरात सुरू असलेली नालेसफाई व्यवस्थित करा ; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन !

August 6, 2021

खळबळजनक : धरणगाव ग्रामीण रुग्णालयात पुन्हा ५ रुग्णांचा मृत्यू !

March 25, 2021

गणित ही मानवी मेंदूची सुंदर आणि शक्तिशाली निर्मिती : प्राचार्य ए.आर.पाटील !

September 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group