TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : कोर्टाने ४९ दोषींपैकी ३८ जणांना सुनावली फाशीची शिक्षा

जाणून घ्या..नेमकं काय घडलं होतं ?

The Clear News Desk by The Clear News Desk
February 18, 2022
in कोर्ट, गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदाबाद (वृत्तसंस्था) अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २४ जुलै २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट ५६ जणांचा मृत्यू झाला होता. हा निकाल अत्यंत महत्वाचा मानला जातोय. अहमदाबादमधील २००८ च्या साखळी बॉम्बस्फोटांचा खटल्याचा निकाल जलदरित्या लावण्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष न्यायालयाने ४९ पैकी ३८ दोषींना UAPA आणि IPC ३०२ च्या अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली. तर इतर ११ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

अहमदाबादच्या विविध भागांमध्ये २००८ ला बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. विशेष न्यायाधीश ए. आर. पटेल यांच्या कोर्टाने १८ फेब्रुवारी ही निकालाची तारीख निश्चित केली होती. या प्रकरणी कोर्टाने आज निकाल दिला. २६ जुलै २००८ ला अहमदाबाद बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी हादरले होते. या प्रकरणी UAPA (अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन अॅक्ट) अंतर्गत ७८ पैकी ४९ आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते. तपासात मदत केल्याबद्दल दोषींपैकी एक असलेल्या अयाज सय्यद याची निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. याशिवाय २९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

बॉम्बस्फोटांत ५६ जणांचा मृत्यू

अहमदाबादच्या बॉम्बस्फोटांमध्ये ७० मिनिटांत ५६ जणांचा मृत्यू झाला होता. या बॉम्बस्फोटांमध्ये २०० हून अधिक जण जखमी झाले होते. १३ वर्षांहून अधिक काळ कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू होती. गेल्या आठवड्यात विशेष कोर्टाने ४९ जणांना दोषी ठरवले होते, तर २८ जणांची निर्दोष मुक्तता केली होती. या बॉम्बस्फोटांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना एक लाख, गंभीर जखमींना ५० हजार आणि किरकोळ जखमींना २५ हजार रुपये मदत द्यावी, असे कोर्टाने आदेश म्हटले आहे.

२९ बॉम्ब फुटलेच नाहीत

गुजरातच्या सुरत पोलिसांनी २८ जुलै ते ३१ जुलै २००८ दरम्यान शहराच्या विविध भागातून २९ बॉम्ब जप्त केले होते. त्यापैकी १७ बॉम्ब वराछा भागात आणि इतर कतारगाम, महिधरपुरा आणि उमरा भागात होते. चुकीचे सर्किट आणि डिटोनेटरमुळे या बॉम्बचा स्फोट होऊ शकला नसल्याचे तपासात समोर आले होते.

७७ आरोपींविरोधात खटला

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ७७ आरोपींविरुद्ध खटल्याची कार्यवाही पूर्ण केली होती. खटला सुरू असलेल्या ७८ आरोपींपैकी एक सरकारी साक्षीदार ठरला होता. हे आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा पोलिसांचा दावा आहे. २००२ च्या गोध्रा दंगलीचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटाचा कट रचला होता, असा आरोप करण्यात आला होता.

अवघ्या १९ दिवसांत ३० दहशतवाद्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. यानंतर उर्वरित दहशतवादी देशातील विविध शहरांतून पकडण्यात आले. अहमदाबादमधील बॉम्बस्फोटांपूर्वी इंडियन मुजाहिद्दीनच्या याच टीमने जयपूर आणि वाराणसीमध्येही स्फोट घडवून आणले होते. देशातील अनेक राज्यांचे पोलीस त्यांना पकडण्यात गुंतले होते. पण ते एकामागून एक बॉम्बस्फोट करत गेले. अहमदाबाद बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ जुलै २००८ ला सुरतमध्येही मालिका बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न होता. पण टायमरमध्ये बिघाड झाल्यामुळे ते स्फोट होऊ शकले नाहीत.

सुरतमध्ये १५ आणि अहमदाबादमध्ये २० तक्रारी दाखल झाल्या होत्या. देशातील विविध शहरांमधून एकूण ७८ जणांना अटक करण्यात आली होती. या स्फोटांत सहभागी असलेल्या अन्य ८ आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे. या बॉम्बस्फोट मालिकेचा मास्टर माईंड यासीन भटकळ हा दिल्लीतील तुरुंगात तर अब्दुल सुभान उर्फ तौकीर हा कोचीन येथील तुरुंगात कैद आहे.

१३ वर्ष सुरु होती सुनावणी

८ फेब्रुवारी रोजी विशेष न्यायालयानं या सर्वांना दोषी ठरवलं होतं. तर २८ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी १३ वर्षांपासून विशेष न्यायालयात सुरु होती. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटात ७८ आरोपी होते. एक आरोपी नंतर सरकारी साक्षीदार झाला. त्यामुळे एकूण ७७ आरोपी होते. तब्बल १३ वर्ष चाललेल्या खटल्यात १,१६३ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. पोलीस आणि कायदेशीर यंत्रणांनी ६ हजारांहून अधिक पुरावे सादर केले होते.

अहमदाबादच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अंबालाल पटेल यांनी ६,७५२ पानांच्या निकालात ४९ आरोपींना दोषी ठरवलं होतं, तर पुराव्याअभावी २८ जणांची निर्दोष मुक्तता केली होती. दहशतवादाच्या आरोपात एकाच वेळी ४९ आरोपींना शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोषींना आयपीसी कलम ३०२ (हत्या) आणि UAPA अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.

७० मिनिटांत २१ बॉम्बस्फोट

२६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये संध्याकाळी ६.४५ वाजता पहिला बॉम्बस्फोट झाला. मणिनगरमध्ये हा स्फोट झाला. मणिनगर हा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ होता. यानंतर ७० मिनिटं आणखी २० बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये ५६ जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. २००२ मधील गोध्रा घटनेचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनने हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते.

दहशतवाद्यांनी टिफिनमध्ये बॉम्ब टाकून तो सायकलवर ठेवला होता. हे स्फोट गर्दीच्या आणि बाजारपेठेत झाले. इंडियन मुजाहिदीन (IM) आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) यांच्याशी संबंधित दहशतवाद्यांचा या स्फोटांमध्ये सहभाग होता. स्फोटांच्या ५ मिनिटांपूर्वी दहशतवाद्यांनी वृत्तसंस्थांना एक मेलही पाठवला होता. ज्यामध्ये ‘तुम्हाला जे हवे ते करा, थांबवता येत असेल तर थांबवा.” असं लिहिलं होतं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
Next Post

धक्कादायक ! झोपेत असताना पत्नीने ब्लेडने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथून बसले आणि अमळनेरला उतरले पण, नवजात बालक थेट पोहचले नंदुरबार !

May 11, 2025

सैफ अली खानवर मध्यरात्री चाकूहल्ला; पोलिस तपासात खंडणीचा धागा

January 17, 2025

कोटद्वारमध्ये बनावट रेमडेसिविर विकणाऱ्या कारखान्यावर छापा ; ५ जणांना अटक

April 30, 2021

गटारींची स्वच्छता करा, अतिक्रमण तात्काळ हटवा ; उपमहापौर सुनील खडके यांच्या सूचना

December 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group