जळगाव (प्रतिनिधी) आगामी तीन ते चार महिन्यात मनपा, न.पा. जिल्हा परिषद व पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली असुन आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे हे उदया गुरुवार दि.०३ जुलै रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार असुन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहे.
जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीचे आयोजन प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत ०३ जुलै रोजी हॉटेल इनफिनिटी, बालाणी रिसोर्ट शेजारी, रेमंड चौफुली जवळ एमआयडीसी येथे सकाळी १०.०० वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांची रणनिती ठरणार आहे. यावेळी ते जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचेशी संवाद साधतील. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक राज्य प्रमुख सूरज चव्हाण, माजी खा. आनंद परांजपे, इद्रिस नाईकवाडी, ओबीसीचे अध्यक्ष कल्याण आखाडे, यांच्यासह विविध सेलचे अध्यक्ष देखील दौऱ्यावर येणार आहे.
या बैठकीस जळगाव-धुळे-नंदुरबारचे प्रभारी माजी मंत्री आ. अनिल पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आ. कैलास पाटील, माजी आ. मनीष जैन, माजी आ.दिलीप सोनवणे यांची उपस्थिती असेल. जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या बैठकीस उपस्थित राहावे असे जिल्हाध्यक्ष संजय पवार, उमेश नेमाडे, कल्पना पाटील, सोनाली पाटील, अभिषेक पाटील, योगेश देसले यांनी केले आहे.