जळगाव (प्रतिनिधी) एकीकडे लक्षवेधी टाकायची, मोठमोठ्याने भाषणे करायची आणि दुसरीकडे मतदारसंघात छापा टाकल्यास ती माझी माणसे आहेत, त्यांना कसे उचलता असे म्हणून पुन्हा पोलिसांवर दबाव आणायचा, त्यांना धमकवायचे हे कुठले लोकप्रतिनिधी आहेत. रेमंड व अवैध धंद्यांच्या बाबतीत त्यांचे सगळे पितळ उघडे पडत असल्याची टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्यावर केली. दुसरीकडे संजय राऊत यांच्या जीभेला हाड नाही, ते बेछूट सुटलेले आहेत, म्हणत गिरीश महाजन यांनी राऊतांवरही टीका केली आहे.
आमदार अर्थसंकल्पीय खडसे यांनी अधिवेशनात जिल्ह्यातील अवैध धंद्यांपुढे पोलिस अधीक्षक हतबल झाले आहेत. अवैध धंद्यांचे खालपासून वरपर्यंत हप्ते जातात, असा आरोप केला होता. कुणाला किती हप्ते जातात, याची पुन्हा आकडेवारीही त्यांनी विधान परिषदेत सांगितली होती. त्याबाबत पत्रकारांनी मंत्री महाजन यांना ग्रामसेवक वितरणानंतर प्रश्न विचारला होता. जिल्ह्यातील अवैध धंदे व रेमंड कामगारांच्या प्रश्नावर खडसे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. जिल्ह्यात अशी दारू विकली जाते, कसे सट्टे-पत्ते सुरू आहेत, हे त्यांनी सांगितले. ऐन अधिवेशन काळात माजी मंत्री खडसे आणि विद्यमान पुरस्कार मंत्री गिरीश महाजन यांच्यात जिल्ह्यातील अवैध धंद्यावरून कलगीतुरा रंगला आहे.
खडसे यांनी पोलिस ठाण्यात फोन केला !
खडसे यांचे भाषण ऐकून पोलिस प्रशासनाने परवा मुक्ताईनगरमध्ये कारवाई केली. तेथे अवैध दारू विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी पकडून आणले. त्यानंतर त्वरित खडसे यांनी पोलिस ठाण्यात फोन केला. माझ्या माणसांना का पकडले ? मला वाटते हे फारच गंभीर आहे. हे खोटं असेल तर त्यांना जाऊन विचारा. त्यांनी पोलिस प्रशासनाला फोन केले नाहीत का? माझ्या माणसांवर छापा कसा टाकला, असे विचारले नाही का? असे मंत्री महाजन म्हणाले.
संजय राऊंत यांच्या जीभेला हाड नाही !
संजय राऊंत यांच्या जीभेला हाड नाही, तोंडाला लगाम नाही. ते बेछूट सुटलेले आहेत. रोज सकाळी उठून कोणाला शिव्या घालतील, कोणाला काय बोलतील याचा नेम नाही अशा शब्दात वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात खासदार संजय राऊत यांच्यावर टिका केली. कसब्याची एक जागा जिंकली म्हणजे तीर मारला असे समजण्याचे कारण नाही. आता जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिकांच्या निवडणूका आहेत तेथे काय दिवे लावतात ते शिवसेनेने दाखवावे, असे आव्हानही महाजन यांनी राऊतांसह महाविकास आघाडीला दिले आहे.