धरणगाव (प्रतिनिधी) मी मंत्री असलो तरी तुमच्यातला आहे. जिल्ह्यासह मतदारसंघातही विकासासाठी कोट्यावधींची कामे मंजूर आहेत. ज्या गावात विकासकामांची गरज तेथे मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. आजवर टू व्हीलर व फोर व्हीलरच्या काळजीपेक्षा बैलजोडीची काळजीला महत्व दिले असून त्यासाठी शेती रस्ते दर्जोन्नत केले. शेतकरी हितासाठी शेत रस्ते डांबरीकरण करून शेतकरी हित जोपासत आहे. गावाची एकजूट व गावाची सकरात्मक भूमिका गाव विकासाला दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी फुलपाट येथे महाराणा प्रताप चौकात झालेल्या जाहीर सभेत केले.
या कामांचे झाले भूमिपूजन !
मुलभूत योजनेतर्गत (२५१५) सुकदेव बाबा नगर येथे पेव्हिंग ब्लॉक – ३ लक्ष, सभामंडप बांधकाम – ५ लक्ष , एल ई डी पथदिवे – ५ लक्ष , ठक्कर बाप्पा योजनेतर्गत सौर दिवे -१० लक्ष , सौर हायमस्ट – १० लक्ष, ग्रा. पं. तिच्या १५ व्या वित्त आयोगातून भूमिगत गटार बांधकाम – ४.५ लक्ष, ग्रामपंचायत फर्निचर व जि.प. शाळेला गेट बसविणे व मागासवर्गीय वस्तीत पेव्हिंग ब्लॉक – २.८० लक्ष अश्या एकूण ४० लाखाच्या सर्व कामांचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, गाव अंतर्गत रस्त्यांपासून ते गावा-गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे जाळे विणले आहे. गावाला पाणीपुरवठा योजना दिली आहे. गावाने आजपर्यंत भर – भरून सहकार्य केले असून लवकरच युवकांसाठी व्यायामशाळा साहित्य देणार आहे. शाळेत पायी जाणाऱ्या मुलींसाठी मोफत सायकल वाटप करणार असून फुलपाट येथे भिल्ल समाजासाठी सामाजिक सभागृह देणार असल्याचे सांगितले. तर जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांनी ग्रामस्थांनी गुलाब भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार केला. ठिक – ठिकाणी महिलानी पालकमंत्र्यांचे औक्षण केले. सभेला गावातील ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शाखा प्रमुख भीमसिंग राजपूत यांनी केले.तर आभार दत्तू पाटील यांनी मानले.
यांची होती उपस्थिती !
या प्रसंगी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, सामाजिक कार्यकर्ते दत्तू पाटील, सरपंच मंगलाबाई पाटील, उपसरपंच विमलबाई भिल, ग्रा.पं. सदस्य योगेश पाटील, सुरेखा पाटील, नितीन भिल, जिजाबाई भिल, ग्रामसेवक संजय जाधव, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, शेतकी संघाचे संजय महाजन, युवासेनेचे दीपक भदाणे, आबा माळी, परिसरातील सरपंचव उपसरपंच भागवत पाटील, गजानन पाटील, गोकुळ पाटील, नारायण पाटील, सुरेखा पवार, नवल पारधी, सचिन बिर्हाडे, मधुकर पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.