TheClearNews.Com
Tuesday, June 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

दुसरा संघ आज ठरणार.. ओम भोसलेची १७० धावांची स्फोटक खेळी ठरली व्यर्थ

vijay waghmare by vijay waghmare
April 24, 2026
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव  प्रतिनिधी – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 क्रिकेटच्या रविवारी होणाऱ्या ग्रॅण्ड फायनल साठी पहिल्या क्वालिफायर मधून विजयी होत जळगाव कोगटा किंग च्या २४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटस ने थाटात प्रवेश केला आहे. रात्री उशिरा सुरू असलेल्या एलिमिनेटर सामन्यातून दुसरा क्वालिफायर साठी संघ ठरेल. दुसरी क्वालिफायर उद्या दि. २५ एप्रिल दुपारी ४ वाजता जैन ड्रीम स्पेसेस या भव्य क्रीडांगणावर होईल.
अमळनेर सुहांस जायंटस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जळगाव कोगटा किंग्स संघाच्या फलंदाजीनी हा निर्णय पूर्णपणे फोल ठरविला. ओम भोसले याने सुरवातीच्या षटकापासून आक्रमक पवित्रा घेत १० उत्तुंग षटकार व १७ चौकारांच्या मदतीने ७४ चेंडूंमध्ये १७० धावांची नाबाद स्फोटक खेळी खेळली. त्याच्यासोबत अक्षय मेघानी २१ धावा (१६ चेंडू), जितेंद्र नाईक २० धावा (१५ चेंडू), बिपिन चांगरे १३ धावा (११ चेंडू), पुर्वेश चौधरी ८ धावा (नाबाद) यांनी योगदान दिले. निर्धारीत २० षटकांत ३ गडींच्या मोबदल्यात २४२ धावांचा विक्रमी डोंगर उभा केला. शुभम शर्मा च्या अचूक थ्रो ने जितेंद्र नाईक याला धावचीत केले. अमळनेर सुहांस जायंट संघातील केशव ठाकूर या गोलदांजाने ४ षटकांमध्ये दोन बळी घेतले. त्याच्या व्यतिरीक्त सर्व गोलंदाजांची पिटाई झाली.
धारदार प्रतिकार करत अमळनेर सुहांस जायंटसच्या फलंदाजांनी केवळ १८.३ षटकांत ३ गडी गमावत २४६ धावा करुन विशाल लक्ष्य गाठले. रिषी यादव २६ (१७ चेंडू), मानव ट्रिबरेवाल २९ चेंडू ६ षटकार व ४ चौकारच्या मदतीने ६४ धावा करत विजयाचा पाया रचला. त्यावर रणजीत निकम व कर्णधार शुभम शर्मा यांच्या तेजतर्रार महत्त्वपूर्ण भागीदारीने हे लक्ष्य सहज पार केले. रणजीत निकम ने २८ चेंडूत ५ षटकार व ७ चौकार लगावत ७६ धावा केल्यात. तर शुभम शर्मा ने आक्रमक खेळी करत ३ षटकार ७ चौकार खेचून केवळ ३० चेंडूत ६५ धावा केल्यात. जळगाव कोगटा किंग्स चे कर्णधार जगदीश झोपे ने २ गडी बाद केले तर ३ षटकांत ५२ धावा देत राज बेलदारने १ गडी बाद केला. रणजीत निकम याला सामनावीर म्हणून पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. यावेळी नितीन रेदासनी, जितेंद्र कोठारी आदी मान्यवर उपस्थीत होते.

पाचोरा एसकेटी योद्धाजचा पराभव..
जळगाव क्रिकेट लिग चा १५ व्या लीग मधील अंतीम सामना हा दि.२३ च्या रात्री खेळविण्यात आला. अमळनेर सुहांस जायंट्सने दमदार फलंदाजी व गोलंदाजीच्या जोरावर पाचोरा एसकेटी योद्धाजचा पराभव केला. ६७ धावांनी मिळालेल्या विजयामुळे गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांक अमळनेर सुहांस जायंट्स पोहचला. शुभम शर्मा व अजय पाटील यांच्या तुफान खेळीने भक्कम पाया रचला. कर्णधार शुभम शर्मा याने ५१ चेंडूत ६९ धावा केल्यात, तर अजय पाटीलने ३५ चेंडूत ६९ धावा करून गोलंदाजांचे पिसे काढले. अमळनेर सुहांस जायंट्स चे १९६ धावांचे आव्हान पाचोरा एसकेटी योद्धाज चा संघ पेलवू शकला नाही. सिद्धेश देशमुख (२५) व सचिन चौधरी (२४) यांनी थोडा प्रतिकार केला, मात्र बाकीच्या फलंदाजांना अमळनेर जायंट्सच्या गोलंदाजांच्या समोर नांगी टाकली. संपूर्ण संघ १९.४ षटकांत १२९ धावांवर गारद झाला. अमळनेर सुहांस जायंट्सच्या सतिश चतुर्वेदीने अवघे १८ धावा देत ४ महत्त्वपूर्ण बळी घेऊन पाचोरा एसकेटीज योद्धाज च्या संघाला खिंडार पाडली. मोहम्मद सैफने ३ बळी, तर गौरव ठाकूर, शुभम शर्मा, केशव ठाकूर यांनी प्रत्येकी १ बळी बाद केले. नाणेफेक वेळी यश सुनील मंत्री, सामना अधिकारी विनीत कुलकर्णी उपस्थित होते. सामानवीर म्हणून शुभम शर्मा याला गौरविण्यात आले. पारितोषीक वितरणाप्रसंगी अचीवर क्लासेसचे सचिन पटेल, प्रमोद चान्सरकर, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, श्री. काबरा अॅड. सुरज जहाँगीर उपस्थित होते.

READ ALSO

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

कारागृहात कैद्याकडून पोलीस रक्षकावर जीवघेणा हल्ला

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAmalner Suhans Giants storm into the final of Jalgaon Cricket League by scoring 242 runs

Related Posts

गुन्हे

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

June 9, 2026
गुन्हे

कारागृहात कैद्याकडून पोलीस रक्षकावर जीवघेणा हल्ला

June 9, 2026
गुन्हे

वहीवाटाच्या वादातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
गुन्हे

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

June 8, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 जुन 2026 !

June 8, 2026
कृषी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस

June 7, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 25 एप्रिल 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : दोन सख्या अल्पवयीन बहिणींना पळवून नेले ; चाळीसगावात परभणीच्या दोघांविरुद्ध गुन्हा !

November 13, 2022

करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या ; जयपूरमध्ये घरात घुसून आरोपींनी झाडल्या गोळ्या !

December 5, 2023

इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कादिमी यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला ; कादिमी थोडक्यात बचावले

November 7, 2021

जैन इरिगेशनला ४४.९ कोटी रुपयांचा नफा ; कंपनीचे तिमाही व सहामाहीचे आर्थिक निकाल जाहीर !

November 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group