धरणगाव (प्रतिनिधी) चोपडा ते धरणगाव रस्त्यावर ३१ रोजी रात्री केलेल्या कारवाईत गांजा विक्री करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून जवळपास ४८ हजारांचा १२०० ग्रॅम जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर अमृत चौधरी, (वय ७६, रा. तावसे ता. चोपडा), असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक जण दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी धरणगावातील कोट बाजार परिसरात येणार आहे. त्यानुसार धरणगाव पोलिसांनी चोपडा रोडवर सापळा रचला दि. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास चोपड्याकडून विना क्रमांकाच्या दुचाकीवर चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक येथील ज्ञानेश्वर चौधरी हा येत होता. त्यावेळी त्याच्या जवळील दुचाकीवरील पांढऱ्या रंगाची गोणीमध्ये ४८ हजार रुपयांचा १२०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. हा गांजा तो विक्री करण्याचे उद्देशाने बाळगताना आढळून आल्यानंतर तत्काळ त्याला अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई !
ही कारवाई पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. नीलेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस उपनिरीक्षक करीम सैय्यद व पोलीस कॉन्स्टेबल सत्यवान पवार, महेंद्र बागुल, सुधीर चौधरी, संदीप पाटील, योगेश पाटील यांनी केली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चंदन विष्णू पाटील यांच्या फिर्यादीवरुन धरणगाव पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर चौधरी याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.