धरणगाव (प्रतिनिधी) अँड. संजय महाजन यांची भाजप तालुकाध्यक्ष म्हणुन त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती, याच कार्याची दखल घेऊन पक्षाच्यावतीने त्यांची भाजप ओबीसी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचे अनेक वर्षा पासून सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदान सर्वांना परिचित आहेे, त्या बद्दल माळी समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्या निमित्त्ताने समाजाच्यावतीने समाज अध्यक्ष रामकृष्ण महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, उपाध्यक्ष विलास महाजन, सहखजिनदार राजेंद्र महाजन, सचिव सुधाकर महाजन, संचालक सुभाष पाटील, गुलाब महाजन, राजेंद्र महाजन, धिरज महाजन, भगवान महाजन, चैत्राम महाजन, विजय महाजन उपस्थित होते. याप्रसंगी पुढील वाटचालीसाठी माळी समाजाचा पंच मंडळांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. संजय महाजन यांनी आभार मानतांना समाजाचा उन्नती तसेच संघटन, समाजाचा विकासासाठी मी आपल्या मागे खंबीरपणे उभे उभा राहिल असे वचन दिले.