धरणगाव (प्रतिनिधी) पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी येथील भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष अँड. संजय महाजन यांची आज भाजपा ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी अँड. महाजन यांना आज नियुक्तीचे पत्र दिले.
माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, संघटन मंत्री रवी अनासपुरे, अँड. किशोरभाऊ काळकर, ओबीसी प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर, प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई पाटील, खासदार उन्मेषदादा पाटील, जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. चंदू भाई पटेल, यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे यांनी पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी धरणगाव तालुक्यातील झुंजार, तरुणांचे आकर्षण, लढवय्या व्यक्तीमत्व अँड. संजय महाजन यांची ओबीसी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
त्यांच्या निवडीसाठी जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, चंद्रशेखर दादा अत्तरदे, शिरीषआप्पा बयास, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, जिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शहराध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक व ता. सरचिटणीस ललित येवले, हरिष डेडिया, टोनी महाजन, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, ज्ञानेश्वर महाजन, विशाल अमृतकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या निवडीबद्दल भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष राजू,मामा भोळे, पीसी आबा पाटील, शिरीष बयस यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी अँड. संजय महाजन यांचे अभिनंदन केले आहे.