TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनिल देशमुख गृहमंत्रीपदी कायम राहणार, वावड्या उठवण्याची गरज नाही : जयंत पाटल

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदललं जाणार ? अशी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. अनिल देशमुख यांच्याकडेच गृहमंत्रीपद राहणार आहे. राज्यात कोणतंही खातेबदल होणार नाही. त्यामुळे वावड्या उठवण्याची गरज नाही, असा खुलासा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि त्यामधील सचिन वाझे यांचा कथित सहभाग या मुद्द्यांवरून मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर आणि एकंदरीतच गृहमंत्रालयाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं होतं. या प्रकरणात खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांचाच राजीनामा घेतला जाण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. “अनिल देशमुख गृहमंत्री म्हणून व्यवस्थिक कारभार करत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा कोणताही विषय पक्षासमोर नाही, त्यामुळे यावरून वावड्या उठवण्याची गरज नाही”, असं जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

जयंत पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, “सरकारमध्ये कोणताही खातेबदल होण्याची चर्चा नाही, त्यामुळे कोणीही वावड्या उठवू नये. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याचं कोणतंही कारण नाही. ते आपलं काम व्यवस्थित करत आहे. त्यामुळे असा कोणताही प्रस्ताव पक्षासमोर नाही.” सचिन वाझे प्रकरणावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “सरकार ठाम मताचं आहे. कोणी काही चुका केल्या असतील किंवा कोणी एखाद्या प्रकरणात सहभागी असेल, तर त्यात कोणाचीही बाजू घेण्याचा प्रश्न नाही. तसेच तसा विचारही सरकारमध्ये कोणीही करत नाही.” पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “सचिन वाझे प्रकरणावर गृहमंत्र्यांनी कोणतीही चूक केलेली नाही. सचिन वाझे यांना एनआयएनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ज्या गोष्टी एनआयएच्या तपासातून समोर येतील, त्यामध्ये कोणीही दोषी आढळलं तर त्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. हिच सरकारचीही भूमिका आहे. सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही.”

“एखाद्या घटनेचा तपास एनआयए करत आहे. त्यांनी त्या गुन्ह्याचा तपास केलाय, एटीएसदेखील तपास करत होतं. त्यांचाही तपास सुरु होता. पण दरम्यानच्या काळात एनआयएच्या हातात तो तपास गेला आहे. या प्रकरणातील ज्या बाबी एनआयएच्या समोर आल्या, त्याचप्रमाणे त्यांच्या समोरही येत असतील. त्यामुळे पुढिल तपासात त्यांना जी माहिती मिळेल, त्यानुसार पुढे कारवाई होईल.” असं जयंत पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये आज झालेल्या बैठकीबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “सरकारसमोर वेगवेगळ्या राज्यांचे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या राज्यांचे विषय आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत असतात. त्यांच्याशी चर्चा करत असतात.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “सरकारमधील खातेबदलाबाबत कोणताही प्रश्न नाहीये. कोणत्याही परिस्थितीत असे बदल करण्याची आवश्यकता नाहीये.” गृहमंत्रीपदासाठी जयंत पाटील, अजित पवार यांच्या नावाची चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “नावं अनेकांची चर्चेत येऊ शकतात. नावं आली म्हणजे खातेबदल होईल असं नाही. तसेच अशी नावांची चर्चा करण्याची आवश्यकताही नाही. आमचे गृहमंत्री अनिल देशमुखचं राहणार. अशा वावड्या उठवण्याची ही पद्धत आहे. तुम्हाला हिरवा कंदिल, यांना हिरवा कंदिल. मला वाटतं व्यवस्थितपणे काम सुरु आहे. त्यामुळे त्यामध्ये बदल करण्याची आम्हाला खातेबदल करण्याची आवश्यकता वाटत नाही.”

परमबीर सिंग यांच्यावरही टांगती तलवार?

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर सीआययूमधील त्यांचे सहकारी रियाज काझी यांची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशी त्यांची चौकशी सुरू आहे. यामध्ये विरोधकांकडून पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून त्यांच्या देखील राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सचिन वाझे, रियाज काझी हे अधिकारी थेट परमबीर सिंग यांच्या हाताखाली येत असल्यामुळे त्यांच्यावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

अरे बापरे... जिल्ह्यात आज आढळले ९९२ कोरोनाबाधित, ७१६ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एन मुक्टो शिष्टमडळाची ७१ दिवसांचा पगार करण्यासंदर्भात सहसंचालक उच्च शिक्षण कार्यालयात चर्चा

December 18, 2020

बाबो ! ऐन उन्हाळ्यात एसीत कुंडली मारून बसला साप अन् उंदराची केली शिकार

March 31, 2022

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे १०० व्या वर्षात पदार्पण ; राज ठाकरेंनी पायावर डोकं ठेवून घेतला आशीर्वाद

July 29, 2021

टेमसेक फाऊंडेशनतर्फे, आर्ट ऑफ लिव्हिंग, आयएएचव्हीमार्फत ६० हजार मास्क प्रशासनाकडे सुपूर्द

June 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group