पुणे (वृत्तसंस्था) बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यात उघडकीस आली आहे. नराधम बापानंच आपल्या पोटच्या अल्पवयीन १३ वर्षीय मुलीवर ७ वर्षांपासून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपी नराधम बापाला अटक केली आहे.
याबाबत कोंढवा पोलिसांनी सांगितले की, या मुलीच्या वडिलांचे किराणा दुकान आहे. तो गेली ७ वर्षे आपल्याच मुलीवर अत्याचार करीत होता. सध्या शाळा बंद असल्याने मुलगी घरीच असते. आपल्यावरील हा अत्याचार ही मुलगी असह्यपणे सहन करत होती. शेवटी तिने आपल्या ऑनलाईन शिकविणार्या शाळेच्या शिक्षिकेला आप बिती कहानी सांगितली. त्यांनी याकडे गंभीरपणे पहात थेट कोंढवा पोलीस ठाणे गाठले. कोंढवा पोलिसांनी तातडीने या शिक्षिकेची फिर्याद घेतली. त्यावरुन पोलिसांनी ३७६ व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन मुलीच्या वडिलांना अटक केली.