नागपूर (वृत्तसंस्था) वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबसचा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट आणि आता नागपूरमध्ये होणारा प्रकल्प हैदराबादला गेला आहे. यामुळे विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
विमान आणि रॉकेटचे इंजन बनवणारी फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रनने महाराष्ट्रातून काढता पाय घेत आपला विमान इंजन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प हैदराबादलामध्ये वळवला आहे. सॅफ्रन कंपनी नागपूरच्या मिहानमध्ये विमान इंजनाच्या देखभाल दुरुस्तीचा युनिट टाकणार होती. वर्षाला इथे 250 विमानांची इंजन दुरुस्ती व देखभाल केली जाणार होती. त्यासाठी कंपनीची 1 हजार 115 कोटींची प्राथमिक गुंतवणुकीची तयारी होती. या प्रकल्पाच्या माध्यमातून पाचशे ते सहाशे कुशल कामगारांना रोजगार मिळणार होता. मात्र, हा रोजगार आता गेला आहे. प्रशासकीय विलंबामुळे हा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती मिळत आहे. कंपनीचे सीईवो यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन प्रकल्प हैदराबादला हलवण्याची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात पाण्याची विजेची मुबलकता आहे. तसेच आपल्याकडे कौशल्य असलेलं मनुष्यबळ देखील उपलब्ध आहे, तरी प्रकल्प राज्याच्या बाहेर जात आहेत. तसेच सत्तेच्या हव्यासापोटी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर केलं असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.