जळगाव (प्रतिनिधी) दुसऱ्या जैन चॅलेंज ट्रॉफी तायक्वांडो स्पर्धा १ ते २ फेब्रुवारी दरम्यान अनुभूती निवासी स्कूल येथे पार पडली. या स्पर्धेत २४ शाळांनी भाग घेतला होता. यामध्ये अनुभूती निवासी स्कूल च्या खेळाडूंनी फाईट ९ गोल्ड,५ सिल्व्हर, ३ कांस्य, पुमसे मध्ये मुलं-मुली मिळून पहिला क्रमांक प्राप्त करत ४ सुवर्ण, १ रौप्य,१ कांस्य पदकांची कमाई करत घवघवीत यश प्राप्त केले. पहिल्यांदाच एवढ्या पदकांची कमाई केल्याने अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबासिस दास यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.
फाईटमध्ये विजयी खेळाडू म्हणून १४ वर्ष वयोगटाआतील मुलींच्या गटात ३५ किलो वजन गटात साची पाटील (सुवर्ण),४१ किलो वजनगटात समिक्षा पवार, ४७ किलो वजन गटात अनुभूती चौधरी (रौप्य), भव्या अग्रवाल, २६ किलो वजन गटात सन्निधी राकीबे (कांस्य), ३८ किलो वजन गटात चार्वी शर्मा, यादनी मोहिते विजयी ठरले. १७ वर्ष वयोगटात ४६ किलो वजन गटात भाविका पाटील (सुवर्ण), ४९ किलो वजन गटात समृद्धी कुकरेजा,५२ किलो वजनगटात दिया देशपांडे, ५९ किलो वजनगटात जानव्ही जैस्वाल, ६३ किलो वजन गटात पलक सुराणा, ६८ किलो वजन गटात अलफिया शाकिर, ६८ किलोवजन गटात अदिती कुकरेजा, ३८ किलो वजन गटात स्तूती गर्ग (रौप्य, किंजल धर्मशाली, ४६ किलोवजन गटात मुक्ती ओसवाल,५९ किलो वजन गटात शाहनी जैन विजयी झालेत.
पुमसे मध्ये वैयक्तीक प्रकारात १४ वर्ष वयोगटात अनुभूती चौधरी सुवर्ण, समिक्षा पवार (कांस्य) तर सांघिकमध्ये अनुभूती चौधरी, समिक्षा पवार, साची पाटील यांनी सुवर्ण पदक पटकाविले. १७ वर्ष वयोगटात वैयक्तीक प्रकारात समृद्धी कुकरेजा सुवर्ण, दिया देशपांडे (कांस्य) तर सांघिक मध्ये समृद्धी कुकरेजा, दिया देशपांडे, पलक सुराणा यांना सुवर्ण पदक मिळाले. पुमसे प्रकारात १४ वर्ष आतील वयोगटात अनुभूती चौधरी उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली. तर १७ वर्ष वयोगटात समृद्धी कुकरेजा उत्कृष्ट खेळाडू म्हणून विजयी ठरली. प्रशिक्षक जयेश बाविस्कर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. विजयी खेळाडूंना जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, राज्य तायक्वांडो असोसिएशनचे सदस्य अजित घारगे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.