TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यात ४२ कोटी ५० लक्षच्या विविध विकास कामांना मंजुरी !

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा

The Clear News Desk by The Clear News Desk
April 23, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाने गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे ही योजना सुरू केली आहे. याच योजनेच्या अंतर्गत जळगाव जिल्ह्यात विविध कामांसाठी तब्बल ४२ कोटी ५० लक्ष रूपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून यासाठीजिल्ह्यातील आमदार व इतर लोकप्रतिनिधींच्या मागणी नुसार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यासाठी लोकप्रतिनिधींकडून मुलभूत सुविधांसाठी निधीची मागणी होत असते. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे ही योजना सुरू करण्यात आली आहे.

READ ALSO

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

याअनुषंगाने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व आमदार व इतर लोकप्रतिनिधीनी केलेल्या मागणी नुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्याकडे जिल्ह्यातील गावं अंतर्गत मूलभूत सुविधा च्या कामांसाठी निधी उपलब्ध होण्याबाबत सतत पाठपुरावा केला होता. त्यानुसार जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ४१७ कामांकरिता ३३ कोटी ५० लक्ष तर जिल्हा परिषद कडे २५९ कामासाठी ९ कोटी असा एकूण ६७६ कामंसाठी तब्बल ४२ कोटी ५० लक्ष निधीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. या कामांमध्ये जिल्हाभरातील विविध गावांमधील विकासकामांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात विकासकामांसाठी याद्वारे भरीव तरतूद करण्यात आलेली आहे.

अशी आहेत मंजूर कामे

या योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील गावंतर्गत सभामंडप ,मल्टीपर्पज हॉल, रस्त्यांवर व चौका चौकात पेव्हींग ब्लॉक बसविणे, रस्ते काँक्रीटीकरण ,गटार बांधकाम,रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण, चौक सुशोभीकरण, स्मशानभूमी बांधकाम व अप्रोच रस्ते, शेड बांधकाम, हायमास्ट लॅम्प बसविणे, गावंतर्गत छोटे पूल व मोर्‍या बांधकाम, सभागृह बांधकाम अशी विविध जनाहिताची मूलभूत सुविधेची कामे करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील आमदार व इतर लोकप्रतिनिधी च्या मागणी नुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने या योजनेतून ६७६ कामे मंजूर करण्यात आली असून त्यासाठी तब्बल ४२ कोटी ५० लक्ष निधीला राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
Next Post

चिंताजनक : जिल्ह्यात एकाच दिवसात २१ कोरोना बाधितांचा मृत्यू ; १०४८ पॉसिटिव्ह, १०३० झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिलेवर अत्याचार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा !

April 9, 2023

5 हजारांची लाच घेणारे मनपातील लाचखोर लिपीकांना एसीबीने पकडले रंगेहाथ !

August 20, 2025

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 सप्टेंबर 2025 !

September 1, 2025

यवतमाळ हादरलं : बंदुकीने गोळ्या झाडून होमगार्ड तरुणाचा खून, सात संशयित अटकेत ; ‘हे’ कारण आले समोर !

June 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group