यवतमाळ (वृत्तसंस्था) शौचास बसण्याच्या कारणातून वाद झाल्यानंतर महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना राळेगाव तालुक्यातील गोपालनगरात घडली. सरिता नामदेव फुलमाळी (४५) रा. गोपालनगर, असे मृत महिलेचे नाव आहे.
शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या गोपालनगरमधील मृतक सरिताशी शेजारी राहणाऱ्या महिलेने तू माझ्या घराजवळ शौचास का बसली?, या कारणातून वाद घातला. २८ सप्टेंबर रोजी वाद झाल्यानंतर राग अनावर झाल्याने सरिता फुलमाळी या महिलेने विषारी औषध प्राशन केले. ही बाब कुटुंबाच्या लक्षात येताच तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी यवतमाळ रवाना केले. कै. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात महिलेला आणताच तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, गावात बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालय पाणी, लाइटची व्यवस्था नाहीय. तसेच घरी देखील शौचालय नसल्याने महिलांना बाहेर जावे लागत असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे. याबाबतचे वृत्त आज पुण्य नगरीने दिले आहे.