TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
February 26, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) आगामी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत पुडुचेरी, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. त्यासाठी, भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशाचा समावेश आहे. या राज्यांमधील निवडणुका पाहता निवडणूक आयोगाच्या पथकांनीही नुकतीच या राज्यांना भेटी दिल्या आहेत. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. कोरोना कालावधीत राज्यसभेच्या १८ जागांसाठी निवडणूक घेणं आव्हान होतं. त्यानंतर, बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतदानाची मोठी प्रक्रिया आपण पार पाडली. त्यामुळे, आताही त्याच पद्धतीने ५ राज्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेऊ. कोरोनामुळे नवी आव्हानं आहेत, नियम पाळून प्रक्रिया पूर्ण करू, असे निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी म्हटलं. तसेच, आसाममधील १२६, तामिळनाडू २३४, पश्चिम बंगालमध्ये २९४, केरळ १४० आणि पद्दुचेरीत ३० जागांसाठी विधानसभा निवडणूक होणार आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ २४ मे २०२१ रोजी, पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ३० मे २०२१ रोजी, केरळ विधानसभेचा कार्यकाळ १ जून रोजी तर आसाम विधानसभेचा कार्यकाळ ३१ मे रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे, विधानसभेचा कार्यकाळ समाप्त होण्यापूर्वी निवडणुकांसाठी मतदानप्रकिया पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच, आदर्श आचारसंहिता लागू होणार असल्याचेही अरोरा यांनी सांगितलं.

पाच राज्यातील निवडणुकांसाठी एकूण ८२४ मतदारसंघात मतदान प्रकिया पार पडत असून १८.६८ कोटी नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी, २.७ लाख मतदान बुथ केंद्र उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, पाच राज्यातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक कार्यक्रमासाठी मतदानाची एका तासाची वेळ वाढविली जाणार आहे, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय. आसाममध्ये २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल अशा तीन टप्प्यात विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार, २ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. तामिळनाडूत एका टप्प्यात मतदान होणार, ६ एप्रिल रोजी मतदान होईल, तर २ मे रोजी पाचही राज्यांच्या मतदानचा निकाल लागणार आहे.

निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले की, ‘मागच्या वर्षी सर्व जगासमोर कोरोनाचे संकट उभे होते, तेव्हा जगभरातील निवडणूक आयोगांसमोर निवडणुका घेण्याचे मोठे आव्हान होते. अनेक देशांनी अशा परिस्थिती हिम्मत दाखवली आणि सर्व नियमांचे पालन करुन निवडणुका घेतल्या. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या १८ जागांवर जून २०२० मध्ये निवडणुका घेऊन सुरुवात केली. आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान बिहारचे होते. तिथे ७.३ कोटी मतदानर होते. ती आमच्यासाठी अग्निपरीक्षा होती.’

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

आरबीआय एमएसएमई समितीवर संजय दादलिका यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावची पाणी समस्या आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी ; धरणगाव जागृत जनमंचची घोषणा (व्हिडीओ)

August 1, 2021

गणपूर प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन

December 16, 2024

मोठी बातमी : प्रवीण मुंढे मुंबई शहराचे नवीन पोलीस उप-आयुक्त ; कुमार चिंता यांचीही बदली !

November 7, 2022

‘सुप्रिम इंडस्ट्रीजचे सुप्रिम फाऊंडेशन’ उभारणार अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह

May 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group