जळगाव (प्रतिनिधी) लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत विवाहितेचे परिसरात राहणाऱ्या आकश दिनेश जाधव (वय २१) याच्यासोबत गेल्या सहा महिन्यांपासून प्रेमसंबध होते. ११ नोव्हेंबर रोजी आकाशने विवाहितेस मांजरी (चंद्रपुर) येथे पळवून नेले. तेथे २५ नोव्हेंबरपर्यंत तीच्यावर अत्याचार केला. यानंतर २६ नोव्हेंबर रोजी जळगावात आणून सोडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पिडीत विवाहितेने शहर पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून आकाश जाधव विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जगदीश मोरे करीत आहे.