TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

पोलीस अंमलदाराच्या प्रसंगावधनामुळे रोकड सुरक्षीत

vijay waghmare by vijay waghmare
June 24, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – गॅस कटरच्या सहाय्याने चोरटे एटीएम मशिन कट करीत होते. दरम्यान, संबंधित बँक सिस्टीमला त्याचा अलर्ट गेला. त्यांनी लागलीच संबंधित पोलीस ठाण्यात कॉल करुन घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान, पोलीस अंमलदाराने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत लागलीच गस्तीवर असलेल्या पोलिसांना घटनास्थळी पाठविले. पोलीस येत असल्याचे समजताच चोरटे गॅस कटरचे साहीत्य तेथेच सोडून पसार झाल्याने चोरीचा प्रयत्न फसला. ही घटना मंगळवारी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास अजिंठा रोडवरील जळगाव टोल काट्याजवळ घडली. पोलिसांनी घटनास्थळावरून गॅस कटर जप्त केले आहे.

शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा रस्त्यावर जळगाव टोलकाट्‌याजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाचे एमटीएम असून त्याच्या आजूबाजूला भंगार साहित्याचे दुकाने आहेत. मंगळवार दि. २३ जून रोजी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करून गॅस कटरच्या सहाय्याने मशीन कापण्यास सुरुवात केली. मात्र मशीनला झालेल्या छेडछाडमुळे बँकिंग सिस्टीममध्ये तसा संदेश गेला. संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत लागलीच एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती दिली. नाईट ड्युटीवर असलेले ठाणे अंमलदार चंद्रकांत पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले.

READ ALSO

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

पोलीसांची कुणकुण लागताच चोरटे पसार

घटनेची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, पोहेकॉ प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, रमेश चौधरी, किरण चौधरी हे घटनास्थळी पोहचले पोलिस येत असल्यीच कुणकुण लागताच एटीएम फोडीचा प्रयत्न करणारे चोरटे तेथून पसार झाले. त्यामुळे एटीएममधील रक्कम सुरक्षित राहिली आहे.

एका बाजूने कापली एटीएम मशिन

चोरट्यांनी एटीएम मशीन ठेवलेल्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर पुढील शटर उघडून बाजूने मशीन कापण्यास सुरुवात केली. त्या वेळी एक बाजू पुर्णपणे कापली गेली होती. त्याचवेळी पोलिस येत असल्याचे समजल्याने गॅस कटर घटनास्थळीच सोडून चोरटे पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळाहून गॅस कटरसह गॅस हंडी व ऑक्सिजन सिलींडर जप्त केले आहे. दरम्यान, चोरी करणारे चोरटे हे तीन ते चार असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. त्यातील दोघ बाहेर येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवून होते तर उर्वरीत दोघे एटीएम कापत होते. दरम्यान, पोलिसांकडून वेगवेगळ्या भागात त्यांचा शोध घेतला जात आहे.

गॅस कटर पेटवण्यासाठीची आगपेटी पोलिसांकडून जप्त

एटीएम मशिन कापण्यासाठी चोरट्यांनी आणलेले गॅस कटर पेटविण्यासाठी चोरट्यांनी आगपेटीचा वापर केला. दरम्यान, जी आगपेटी वापरली ती चोरटे एटीएम मशिनच्या की बोर्डवर पडलेली 3 पोलिसांना मिळून आली. पोलिसांनी ती आगपेटी हस्तगत केली आहे. दरम्यान, ती आगपेटी वेगळ्याच कंपनीची असून ती या परिसरारात न मिळणारी आहे. त्या आगपेटीवरुन चोरट्यांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAttempts to cut off gasbreak ATMsend alert foiled

Related Posts

गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
जळगाव

महिला शक्ती संघातर्फे आरोग्य मार्गदर्शन व विहंगम योग शिबिर उत्साहात संपन्न ….

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील मास्टर कॉलनी भागात २३ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

March 3, 2021

प्रास्ताविक कृषी कायद्या विरोधात कृषी निविष्ठा धारक आक्रमक ; आजपासून तीन दिवस दुकाने बंद !

November 2, 2023

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026

पहूर : फार्मासिस्ट म्हणुन एका रजिस्ट्रेशनवर नियमबाह्य काम केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल !

April 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group