जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एलसीबीचे तत्कालीन निलंबित निरीक्षक किरणकुमार बकालेंना अटक करण्यासाठी गेलेली दोन्ही पथके रिकाम्या हातीच परतले आहेत. या पूर्वीही जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे तीन पथक रिकामेच परतले आहेत.
दुसरीकडे ऑडिओ क्लिप व्हायरल करणारे एएसआय अशोक महाजन यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी प्रकरणात मंगळवारी आणखी एका साक्षीदाराने म्हणणे मांडण्याची विनंती न्यायालयाला केली. ती मान्य करत या प्रकरणी सुनावणी २० ऑक्टोबर रोजी ठेवली आहे. जळगाव न्यायालयाने बकाले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी वकिलातर्फे औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. त्याची सुनावणी २० ऑक्टोबर रोजी होणार आहे. या प्रकरणाचा तपास जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडून काढून तो होम डीवायएसपी संदीप गावित यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यांनी बकाले यांच्या शोधार्थ तीन पथकांची नेमणूक केली होती. यातील दोन पथके नुकतीच रिकाम्या हाती परत आले आहेत.