धरणगाव प्रतिनिधी – केळीला व कापसाला योग्य भाव मिळत नाही. केळी विमा योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होतो आहे. या विषयी राज्य सरकार काहीही बोलत नाही. त्यामुळे राज्य सरकारला जागे करण्यासाठी १७ सप्टेंबरला जळगाव येथे शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केले.
जळगाव येथे १७ सप्टेंबरला आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर येथील जी एस कॉटन जिनिग येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली. त्या वेळी मार्गदर्शन करताना बोलत होते.माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना ठाकरे गटाचे युवासेनाजिल्हाप्रमुख अनेक शेतकऱ्यांना केळीचे नुकसान झाल्यावर मदत मिळत नाही. कारण चुकीच्या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले आहे. दोष स्वयंचलित हवामान केंद्राचा असताना नुकसान शेतकऱ्यांचे होते. या विषयाकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत माजी खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केले.शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, उद्योजक सुरेश नाना चौधरी, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी शेतकरी संघटना तालुका प्रमुख विजय पाटील धरणगाव तालुका प्रमुख जयदीप पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटा चे तालुका प्रमुख संजय पाटील शिवसेना माजी जी प उपाध्यक्ष जानकीराम पाटील, शेतकरी नेते सुनील देवरे, संदीप पाटील शिवसेना शहर प्रमुख भागवत चौधरी राष्ट्रवादी शरद पवार गट शहर प्रमुख लक्ष्मण पाटील
आदी उपस्थित होते. माजी खासदार उन्मेष पाटील म्हणाले की, केळी उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे. केळीला भाव मिळत नाही. शेतकरी कष्ट करून पीक उभे करतो पण निसर्गाच्या लहरीपणामुळे ते नष्ट होते. दुसरीकडे विमा कंपनी शेतकऱ्यांना साथ देत नाही. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन विनोद रोकडे यांनी केले तर आभार गजानन महाजन यांनी मानले
















