धरणगाव (प्रतिनिधी) आज धरणगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक दिनेश मासुळे यांनी पदभार स्वीकारला म्हणून प्रवासी मंडळ यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रवासी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कोठारी, उपाध्यक्ष रविंद्र भागवत सचिव एस. डब्लु.पाटील, सदस्य दिनकर पाटील किरण सिंग परिहार, तसेच महावीर पत संस्थाकडून अरविंदकुमार ओस्तवाल यांनी सत्कार केला. बँकेकडून सोमनाथ पाटील कॅशियर, व सुशील भामरे यांनी आभार व्यक्त केले.
















