रावेर (प्रतिनिधी) उपचार करून फीची मागणी केल्याचा राग येऊन येथील सुश्रुत हॉस्पिटलच्या डॉक्टरांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
य संदर्भात अधिक असे की,मनोहर महाजन (वय ४५) यांच्या अपघातात बोटाला फॅक्चर झाल्यामुळे त्यांना बुधवारी (ता. २१) रात्री साडेदहाच्या सुमारास उपचारार्थ येथील नवीन विश्रामगृहाजवळील डॉ. योगेश महाजन यांच्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर डॉ. महाजन यांनी पाच हजार रुपये फीची मागणी केली असता मनोहर महाजन यांच्यासोबत असलेले प्रमोद महाजन व योगेश महाजन या तिघांनी डॉ. महाजन यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करून फी न देता निघून गेले. डॉ. महाजन यांनी रावेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पुढील तपास श्रेणी पोलिस उपनिरीक्षक इस्माईल शेख करीत आहेत.