धरणगाव (प्रतिनिधी) दिपावली निमित्ताने मातंग वाड्यात भैयाभाऊ महाजन यांच्यावतीने मिठाई वाटप करण्यात आले. याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी यांचे हस्ते मरीआई माताचे पुजन केले.
गोरगरिब मातंग समाजाची दिपावली ही सुख समृद्धीची आनंदाची जाओ यासाठी भैयाभाऊ महाजन यांनी घरोघर जाऊन मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या. मातंग समाजाच्यावतीने महिलांनी भैयाभाऊ महाजन यांचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी, सुभाष महाजन, राजु सुकलाल महाजन, भैयाभाऊ महाजन, राहुल महाजन, महेंद्र वऱ्हाडे, शेखर महाजन, ज्ञानेश्वर महाजन, सोपान महाजन, राहुल रोकडे, एकनाथ चित्ते, शुभम महाजन, आण्णा महाजन, चुनलाल महाजन, रामनाथ महाजन, भुषण माळी, सुरेश चित्ते, फकीरा जाधव, ज्ञानेश्वर माळी, प्रदीप माळी व परिसरातील भैयाभाऊ वर प्रेम करणारे मित्र परिवार उपस्थित होते.